स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, नव्या योजनेअंतर्गत घरबसल्या रोख रक्कम घरपोच मिळणार

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु करत आहे. SBI Door Step Banking

स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, नव्या योजनेअंतर्गत घरबसल्या रोख रक्कम घरपोच मिळणार
स्टेट बँक ऑफ इंडिया

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु करत आहे. या सुविधेअंतर्गत बँकेच्या ग्राहक घरबसल्या 10 रुपयापर्यंतची रक्कम मागवू शकतात. बँकेच्या ग्राहकांना त्यासाठी टोल फ्री क्रमांक, मोबाईल अ‌ॅप आणि नेट बँकिंगची मदत घ्यावी लागेल. ग्राहकांना कॅश घरपोच देण्यासोबत बँकिंग विषयी इतर कामं करता येऊ शकतात. कॅश घर पोहोच देण्यासोबत स्टेट बँकेकडून चेक, ड्राफ्ट, पे ऑर्डर, पिक अप सेवा आणि ड्राफ्ट सेवा या सेवा बँकेकडून पुरवण्यात येणार आहे. (SBI started Door Step Banking service for customer)

स्टेट बँकेंच्या या योजनेसाठी 10 हजारांपर्यंतची रक्कम घरबसल्या मिळणार आहे. तर, 20 हजारांपर्यंतची रक्कम काढणे आणि जमा देखील करता येतील मात्र या सेवेसाठी शुल्क लागणार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार केल्यास 100 रुपये तर आर्थिक व्यवहारांशिवाय इतर सेवेचा लाभ घेतल्यास 60 रुपये शुल्क लागणार आहे. KY कागदपत्रे एकत्रित करणे, हयातीचा दाखला जमा करणे, Form 15H जमा करण्यासाठी या सेवेचा लाभ होणार आहे.

स्टेट बँकेची Door Step Banking सेवा

एसबीआयच्या Door Step Banking या सेवेची माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. यासेवेसाठी निकष लावण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक आहे, जे बँकेत जाऊ शकत नाहीत ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय केवायसी जमा करावे लागणाऱ्या ग्राहकांना देखील याचा लाभ होणार आहे. मात्र, ग्राहकांच्या बँक खात्याशी त्यांच्या मोबाईल नंबर लिंक करावे लागणार आहेत. संयुक्त खाते, मायनर खाते, व्यावसायिक खातं यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. स्टेट बँकेची शाखा असेल तिथून 5 किलोमीटर परिसरात त्या ग्राहकानं राहायला असलं पाहिजे.

या योजनेचा लाभ कसा घेणार?

Door Step Banking या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. स्टेट बँकेची वेबसाईट www.psbdsb.in वर देखील सेवेसाठी नोंदणी करताय येणार आहे.

संबंधित बातम्या:

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात

बँक खातेदारांना सरकारचं गिफ्ट; आता ‘या’ सुविधा घरबसल्या मिळणार

(SBI started Door Step Banking service for customer)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI