AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात

एमसीएलआर संबंधी हा नवा नियम 11 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात
| Edited By: | Updated on: Jan 11, 2021 | 7:40 PM
Share

नवी दिल्ली : सरकारी क्षेत्रातील यूनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या लँडिंग रेट (MCLR) मध्ये 15 बेस पॉईंटने घट केली आहे. ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे 15 आणि 5 बेसिस पॉइंट्सने कमी केलं आहे. यामुळे आता ओव्हरनाईट एमसीएलआर 6.75 टक्क्यांच्या जागी 6.60 टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा एमसीएलआर 6.70 टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी 6.75 टक्के इतका होता. एमसीएलआर संबंधी हा नवा नियम 11 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (business news government bank union bank of india cuts mclr rate )

कार्यकाळ एमसीएलआर (%)

ओव्हरनाईट एमसीएलआर – 6.60%

– 1 महिन्याचा एमसीएलआर – 6.70%

– 3 महिन्याचा एमसीएलआर- 6.90%

– 6 महिन्याचा एमसीएलआर – 7.05%

– 1 महिन्याचा एमसीएलआर – 7.20%

FD च्या दरांमध्ये वाढ

याआधीही देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक SBI ने काही मोजक्याच मॅच्योरिटी पीरियडच्या मुदत ठेवींच्या (FD) दरांमध्ये वाढ केली होती. बँकने 1 ते 2 वर्षाहून कमी एफडीवर व्याज दरांमध्ये 10 टक्के पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांवर वाढवलं आहे.

एसबीआयचे सुधारित दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल एफडीवर 8 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत. खरंतर, एसबीआयने याआधीही 10 सप्टेंबर 2020 रोजी मुदत ठेवींवरील व्याज दरात सुधारणा केली होती.

अ‍ॅक्सिस बँकेचंही ग्राहकांना मोठं गिफ्ट

खासगी क्षेत्रातील बड्या अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. कारण, आता मुदत ठेव (Fixed Deposit) अकाली बंद ठेवण्यासाठी बँके कोणताही दंड घेणार नाही. अ‍ॅक्सिस बँकेने आज 15 डिसेंबर 2020 रोजी आणि त्यानंतर बुक झालेल्या सर्व नवीन रिटेल मुदत ठेवी अकाली बंद केल्यास दंड घेतला जाणार नाही अशी घोषणा केली आहे. ही बातमी ग्राहकांच्या हिताची असून लिक्विडिटीच्या गरजेबद्दल कसलीही काळजी न करता ग्राहकांना जास्त काळासाठी बचत करण्यास आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन सुविधा सर्व नवीन मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींना (Recurring Deposits) लागू करण्यात येणार आहे. 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन ठेवींसाठी अकाली दंड आकारला जाणार नाही. इतकंच नाही तर बुकिंगनंतर 15 महिन्यांआधी संपूर्ण ठेव मागे घेतली तरीही दंड आकारला जाणार नाही. (business news government bank union bank of india cuts mclr rate )

संबंधित बातम्या – 

सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख

अ‍ॅक्सिस बँकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, वेळेआधी FD बंद केली तर नाही लागणार दंड

(business news government bank union bank of india cuts mclr rate )

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ