
भारतात आता सेविंग पॅटर्न बदलतोय. लोक जास्तीत जास्त शेअर मार्केट म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. लोकांचा शेअर मार्केट आणि म्यूचुअल फंडच्या गुंतणूकीकडे असलेला ओघ लक्षात घेऊन मार्केट रेग्युलेटर सेबीने एक अनोखा प्लान बनवला आहे. यात लोकांना म्यूचुअल फंडच्या ग्रोथ सोबत वीमा सुरक्षेचाही लाभ मिळू शकतो. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी शुक्रवारी सांगितलं की, मार्केट रेग्युलेटर लवकरच कॉम्बो प्रोडक्ट आणण्याची योजना बनवत आहे. यात म्यूचुअल फंड कंपन्यांना जीवन विमासोबत गुंतवणूकीला जोडता येईल. लोकांचा याचा डबल फायदा होईल.
रेग्युलेटर लवकरच या प्रस्तावावर कंस्ल्टेशन पेपर आणणार आहे असं माधबी पुरी बुच यांनी आयसीएआयच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. सध्या अनेक फायनाशियल प्रोडक्ट आधीपासूनच वीमा आणि गुंतवणूकीचा ऑप्शन एकत्र जोडून लोकांसमोर सादर करत आहेत.
सेबी बाजारात एक नवीन प्रोडक्ट आणणार आहे. यात गुंतवणूकदारांना जीवन विमासोबत म्यूचुअल फंड गुंतवणूकीला जोडण्याचा ऑप्शन असेल. सेबी प्रमुखांचा कार्यकाळ फेब्रुवारीच्या अखेरीस संपणार आहे. ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करणं हा वीमा आणि म्यूचुअल फंडला जोडण्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण क्षेत्रात ‘व्यवस्थित गुंतवणूक योजना’च्या विस्ताराच्या अनेक शक्यता आहेत. पण गुंतवणूकीची सध्याची वॅल्यू कमी आहे.
फायदा काय?
म्यूचुअल फंड आणि जीवन वीमा या प्रोडक्टच्या माध्यमातून लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाला आकर्षक आणि किफायतशीर योजनेचा लाभ घेता येईल, अशी माधबी पुरी यांना अपेक्षा आहे. याचा एक लाभ असा सुद्धा आहे की, जास्त गुंतवणूकदार जोडले गेल्याने अतिरिक्त जीवन वीमा प्रीमियमची मार्जिनल कॉस्ट कमी राहील.
टर्म इंश्योरेंसचा बेनेफिट
आम्ही म्यूचुअल फंडात सरल जीवन वीमा, टर्म जीवन वीमा यांचाा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा योजनेच्या माध्यमातून आम्हाला त्या लोकांपर्यंच पोहोचायच आहे, ज्यांची कमी वॅल्यूची SIP असेल आणि म्यूचुअल फंड गुंतवणूकीसोबत टर्म जीवन विमाचा त्यांना लाभ मिळेल.