Semiconductor Share: मोठी संधी… हे दोन शेअर मालामाल करणार.. सेमीकंडक्टर क्षेत्रातून गुंतवणूकदारांची कमाई

Semiconductor Stock Investors: सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची नांदी होत आहे. त्याचवेळी या दोन शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. कोणते आहेत ते दोन शेअर? किती लाख कोटींचे आहे चिप मार्केट?

Semiconductor Share: मोठी संधी... हे दोन शेअर मालामाल करणार.. सेमीकंडक्टर क्षेत्रातून गुंतवणूकदारांची कमाई
सेमीकंडक्टर क्षेत्रातून गुंतवणूकदारांची कमाई
| Updated on: Jul 05, 2026 | 3:10 PM

Semiconductor Stock Investors: मोदी सरकारने भारताला सेमी कंडक्टर हब तयार करण्यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांचे मिशन हाती घेतले आहे. या योजनेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत 75% चिप्स उत्पादन करणे हे आहे. त्यासाठी गुजरात आणि दक्षिणेतील तामिळनाडूसह इतर राज्यात प्रकल्प येऊ घातले आहेत. तैवान आणि चीन हे दोन देश भारताचे या क्षेत्रातील सर्वात मोठे स्पर्धक असतील. यामध्ये केन्स टेक्नॉलॉजी आणि सीजी पॉवर सारख्या कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या दोन्ही कंपन्या चिप पॅकेजिंग आणि टेस्टिंग व्यवसायात आघाडीवर आहेत.

केंद्र सरकार देशाला चिप, सेमीकंडक्टर उत्पादनासाठी तयार करत आहे. सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’साठी 1.25 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजूरी दिली आहे. याचा अर्थ मोबाईल, कार आणि आधुनिक गॅझेट्सच्या वापरात येणारी चिप्स आता भारतात मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. वर्ष 2030 पर्यंत भारत हा देशातंर्गत गरजेच्या 75 टक्के चिप उत्पादन करेल.

1- केन्स टेक्नॉलॉजीवर गुंतवणूकदारांचे लक्ष

सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करणारी कंपन्यांमध्ये केन्स टेक्नॉलॉजीचे नाव सर्वात आघाडीवर आहे. कंपनी गुजरातमध्ये ‘ओएसएटी’ (OSAT) सुविधा केंद्र तयार करत आहे. या ठिकाणी केन्स टेक्नॉलॉजी चिप पॅकेजिंग आणि टेस्टिंगचे काम करणार आहे. या कंपनीला या क्षेत्रात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 5.5 टक्क्यांची उसळी दिसली. हा शेअर बाजार बंद होताना 3333 रुपयांवर होता. गेल्या पाच वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 328 टक्के असा दमदार परतावा दिला.

2- सीजी पॉवर ही बाजारात

सीजी पॉवर ही कंपनी केवळ विद्युत उत्पादन उपकरणं तयार करण्याचे काम करत नाही तर आत ती सुद्धा सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरली आहे. कंपनीच्या ओएसएटी प्रकल्पाला सरकारने मंजूरी दिली आहे. यामध्ये कंपनी सेमीकंडक्टर पॅकेजिंग क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये विक्री सत्र दिसले. हा शेअर 6.97 टक्कांनी घसरून 892 रुपयांवर आला. पण तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकतो. कंपनीचा मागील ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. कंपनीने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us