कसलं कोट’कल्याण’; Kalyan Jewellers चा शेअर गडगडला, कारण तरी काय?
Kalyan Jewellers Share Price : कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये सातत्याने चढउतार दिसून येत आहे. गेल्या 3 आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 38 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. त्यामागील कारण तरी काय?

कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी चांगली तेजी दिसली. पण मंगळवारी या शेअरने पुन्हा एकदा झटका दिला. कंपनीचा शेअर, व्यापारी सत्रात जवळपास 7 टक्क्यांनी घसरला. हा शेअर आता 500 रुपयांपेक्षा कमी आला. हा शेअर त्याच्या उच्चांकांपेक्षा 38 टक्क्यांहून अधिकने घसरला. कल्याण ज्वैलर्समधील ही घसरण अनेकांसाठी न उमगणारी आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
घसरणीचे कारण तरी काय?
BSE आकड्यांनुसार, प्रमोटर्स रमेश त्रिक्कुर कल्याणरमन आणि सीतारम त्रिक्कुर कल्याणरमन यांनी काही वित्त संस्थांकडील त्यांची तारण हिश्यात अनुक्रमे 1.65 टक्के आणि 1.85 टक्के वाढ केली आहे. कल्याण ज्वेलर्सवर आयकर खात्याने छापा टाकला आणि व्यवस्थापकाने लाच घेतल्याचे आरोप कंपनीने फेटाळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला स्टॉक वधारला होता. या 2 जानेवारी रोजी हा स्टॉक 794.60 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर होता. तर त्यानंतर त्यात घसरणीचे सत्र सुरू झाले. यावर्षातील 15 मधील 11 व्यापारी सत्रात घसरण दिसून आली.




सर्व आरोप खोटे
आयकर छाप्याचे वृत्त धादांत खोटं असल्याचे कंपनीने सांगितले. तर लाच घेतल्याचा आरोपही खोटा असल्याचे म्हटले. आमच्या कोणत्या कॅम्पसमध्ये कसलाही छापा पडलेला नसल्याचा दावा रमेश कल्याणरमन यांनी केला. या केवळ अफवा असल्याचे ते म्हणाले.
कंपनीच्या शेअरमध्ये किती घसरण?
कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये मंगळवारी जवळपास 7 टक्क्यांची घसरण दिसून आली. व्यापारी सत्रा दरम्यान हा शेअर 491.25 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला. तर कंपनीच्या शेअरमध्ये थोडीबहूत वाढ दिसली. हा शेअर 539.30 रुपयांवर उघडला होता. तर एक दिवसांपूर्वी शेअर तेजीसह 531.15 रुपयांवर बंद झाला. तर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी कंपनीचा शेअर 7.09 टक्के तेजीसह 493.50 रुपयांवर व्यापार करत होता. हा शेअर तीन आठवड्यात जवळपास 38.17 टक्के घसरला आहे. या घडामोडींमुळे या कंपनीचे मार्केट कॅप 50,669.26 कोटी रुपयांवर पोहचला आहे. पूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 54,784.69 कोटी रुपये होते. एकाच दिवसात कंपनीचे मार्केट कॅप 4,115.43 कोटींनी घसरले आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.