राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स

| Updated on: Oct 23, 2021 | 10:54 AM

झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड मध्ये 1.1 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. त्याचवेळी, फेडरल बँकेत त्यांनी 0.9 टक्के भागभांडवल वाढवले ​​आहे. गेल्या एका वर्षात या समभागांनी गुंतवणूकदारांना 216 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. | Rakesh Jhunjhunwala

राकेश झुनझुनवालांनी या दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स
राकेश झुनझुनवाला
Follow us on

नवी दिल्ली: शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक कृतीवर गुंतवणूकदारांचे लक्ष असते. गेल्या वर्षभरात राकेश झुनझुनवाला यांनी दोन कंपन्यांच्या समभागांवर 216 टक्के परतावा मिळवला आहे. इंडियाबुल्‍स रीयल एस्‍टेट लिमिटेड आणि फेडरल बैंक (Federal Bank Ltd) या दोन समभागांमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी मोठी गुंतवणूक केली आहे.

झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड मध्ये 1.1 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. त्याचवेळी, फेडरल बँकेत त्यांनी 0.9 टक्के भागभांडवल वाढवले ​​आहे. गेल्या एका वर्षात या समभागांनी गुंतवणूकदारांना 216 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

BSE वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2021 (Q2FY22) तिमाहीसाठी इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीमध्ये 1.1 टक्के शेअर्स (500,000 शेअर्स) खरेदी केले आहेत. 22 ऑक्टोबर रोजी ट्रेडिंग सत्रादरम्यान गुंतवणूकीचे मूल्य 82.6 कोटी रुपये होते. म्हणजेच या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे.

राकेश झुनझुनवालांनी पोर्टफोलिओमधील कोणते पाच समभाग विकले?

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधून 5 कंपन्यांचे शेअर्स कमी केले आहेत. त्यापैकी 2 कंपन्या अशा आहेत, ज्यात त्यांचा हिस्सा आता 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामध्ये Mandhana Retail Ventures, Lupin, Aptech, Fortis Healthcare आणि MCX या समभागांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांनी Mandhana Retail चे 5.4 टक्के समभाग विकले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे Mandhana Retail ची 12.7 टक्के इतकी हिस्सेदारी होती. आता त्यांचा हिस्सा केवळ 7.4 टक्के इतका राहिला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे Mandhana Retail कंपनीचे 1630900 समभाग आहेत. त्याची एकूण किंमत 2.5 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षभरात या समभागाने गुंतवणूकदारांना 84 टक्के इतका परतावा दिला आहे.

पाच रुपयांच्या समभागाची किंमत झाली 42 रुपये

सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात Rattanindia Enterprises कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत 700 टक्के फायदा करुन दिला आहे.

2021-22 मध्ये स्टॉक आतापर्यंत 700 टक्क्यांहून वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी या समभागाची किंमत अवघी पाच रुपये होती. आता याच समभागाची किंमत 42.8 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत हा समभाग 739 टक्क्यांनी वाढला आहे.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय, जाणून घ्या फायदे आणि धोके

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय, जाणून घ्या फायदे आणि धोके

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच