AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market | आता कसा लावाल गुंतवणूकदारांना चुना! प्रयत्न केला तर AI झटकन पकडणार

Share Market | बाजार नियंत्रक SEBI चे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी मोठी माहिती दिली आहे. आता बाजारात हेराफेरी करणाऱ्यांना चाप बसणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजिन्सचा वापर करुन अशा भामट्यांना पकडण्याची तयारी करण्यात आली आहे, कसे काम करते हे तंत्रज्ञान

Share Market | आता कसा लावाल गुंतवणूकदारांना चुना! प्रयत्न केला तर AI झटकन पकडणार
| Updated on: Feb 25, 2024 | 3:30 PM
Share

नवी दिल्ली | 25 February 2024 : शेअर बाजारात हेरा-फेरी करणाऱ्यांना लवकरच चपराक बसणार आहे. अशा भामट्यांना पकडण्यासाठी मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) फुलप्रुफ तयारी केली आहे. त्यामुळे असे काम करणारे लवकर पकडले जातील. तसेच बाजारातील अशा प्रकारांना पण आळा बसणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्या ब्रोकरला पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence -AI) वापर करण्यात येणार आहे. कसे काम करेल हे तंत्रज्ञान, जाणून घ्या…

आता एआयचा वापर होणार

मार्केट रेग्युलेटर सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी एका कार्यक्रमादरम्यान शनिवारी याविषयीची माहिती दिली. त्यांनी शेअर बाजारात गडबड करणाऱ्यांना पकडण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदारांना फसवणाऱ्यांना लगाम घालता येईल. लवकरच सेबी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे.

बाजारात येईल पारदर्शकता

दिल्लीत नुकतेच असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंजेज मेंबर्स ऑफ इंडियाचे 13 वे आंतरराष्ट्रीय संमेलन झाले. त्यात कमलेश वार्ष्णेय यांनी सेबीद्वारे AI तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती शेअर केली. बाजारात पारदर्शकता वाढावी आणि गडबडीला आळा बसावा यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सातत्याने याविषयीची कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांचा विश्वास सर्वात महत्वाचा

सेबीने टाकलेल्या पावलांविषयी वार्ष्णेय यांनी माहिती दिली. गुंतवणूकदारांचा विश्वास हा सर्वात महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. जर तेच नसतील तर या सिस्टिमला अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ब्रोकर गडबड करत आहेत. त्यांच्यावर बारीक लक्ष आहे. पण या प्रकाराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

नियमांचे उल्लंघन पडेल महागात

सेबीच्या नियमांचे उल्लंघन करणे महागात पडेल, असे सेबीने स्पष्ट केले आहे. गडबड थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पण नियमांचे उल्लंघन केल्यास अशा ब्रोकर्सवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आता लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापरामुळे ही गडबड लक्षात येईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.