AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: 1 लाखाचे बनले 15 लाख, ‘या’ कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात अनेक लोक पैस गुंतवतात आणि चांगले पैसे कमावतात. आज आपण अशा एका शेअरची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.

Share Market: 1 लाखाचे बनले 15 लाख, 'या' कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल
share market
| Updated on: Jun 27, 2025 | 5:25 PM
Share

शेअर बाजारात अनेक लोक पैस गुंतवतात आणि चांगले पैसे कमावतात. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे लोक कायम फायद्यात असतात. आज आपण अशा एका शेअरची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने 1400 टक्के परतावा दिला आहे. या शेअरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टायगर लॉजिस्टिक्स (इंडिया) लिमिटेड कंपनी आतापर्यंत बीएसईवर रजिस्टर होती, मात्र आता कंपनी 28 जून रोजी एनएसईच्या मेनबोर्डवर लिस्ट होणार आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना 1400 % परतावा दिला आहे.

गेल्या 5 वर्षात टायगर लॉजिस्टिक्सच्या शेअरने 3 रुपयांवरून 57.50 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. तुम्ही 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला 15 लाख रुपये मिळाले असते. या कंपनीचे मार्केट कॅप 605.7 कोटी रुपये आहे. आता ही कंपनी एनएसईच्या मेनबोर्डवर लिस्टिंग होणार असल्याने कंपनीचे शेअर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कंपनीचे अधिकारी काय म्हणाले?

टायगर लॉजिस्टिक्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, ‘एनएसई लिस्टिंगमुळे कपनीला जास्त एक्सपोजर आणि चांगला व्हॉल्यूम मिळेल. यामुळे कंपनीचा व्यवसाय आणि ब्रँड व्हॅल्यू वाढेल.’ समोर आलेल्या माहितीनुसार टायगर लॉजिस्टिक्स ही कंपनी इंटरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम क्लिअरन्स आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स या सेवा देते.

तज्ज्ञ काय म्हणाले?

तज्ज्ञांनी टायगर लॉजिस्टिक्स कंपनीबाबत बोलताना सांगितले की, ही कंपनी भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता कंपनी एमएसईवर लिस्ट होत आहे, त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

टीप – या लेखात दिलेली माहिती फक्त एक बातमी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करुन तोटा झाल्यास टीव्ही 9 मराठी जबाबदार असणार नाही.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.