Share Market: रिलायन्सच्या समभागधारकांना तीन वर्षांत 117 टक्के रिटर्न्स; AGM मध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

Reliance AGM: गुंतवणुकदारांना रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मुकेश अंबानी ऑईल टू केमिकल (O2C) कारभार, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांसंदर्भात अनेक मोठे निर्णय जाहीर करु शकतात.

Share Market: रिलायन्सच्या समभागधारकांना तीन वर्षांत 117 टक्के रिटर्न्स; AGM मध्ये मोठ्या घोषणेची शक्यता
भांडवली बाजार
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 12:37 PM

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ( Reliance Industries Limited- RIL) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) गुरुवारी पार पडणार आहे. यापूर्वी शेअर बाजारात रिलायन्स कंपनीच्या समभागावर दबाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी बाजार उघडल्यापासून रिलायन्सच्या समभागाची किंमत जवळपास एक टक्क्याने घसरली आहे. रिलायन्सच्या समभागाने गेल्या तीन वर्षांमध्ये 117 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तसेच AGM नंतर रिलायन्सच्या समभागाचा भाव वधारतो, हा आजपर्यंतचा पायंडा आहे. (Reliance industries limited RIL share stock price)

तज्ज्ञांच्या मतानुसार, गुंतवणुकदारांना रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मुकेश अंबानी ऑईल टू केमिकल (O2C) कारभार, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांसंदर्भात अनेक मोठे निर्णय जाहीर करु शकतात.

समभागधारकांना मोठा लाभ मिळणार?

RIL च्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्सच्या समभागधारकांना कोणता लाभ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिलायन्स कंपनी सध्या नफ्यात असल्यामुळे शेअर होल्डर्सना डिव्हिडंट मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेअर बाजारात रिलायन्सच्या समभागाचा भाव वधारण्याची शक्यता आहे. अनेक ब्रोकिंग कंपन्यांनी रिलायन्सच्या समभागांची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात रिलायन्सच्या शेअरची किंमत 2237 रुपयांपर्यंत पोहोचले असा अंदाज आहे.

रिलायन्स जिओ देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार?

देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ( Reliance Industries Limited- RIL) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) गुरुवारी पार पडणार आहे. यावेळी RIL उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी काही महत्वपूर्ण घोषणा करु शकतात. यापैकी सर्वात जास्त उत्सुकता ही रिलायन्स जिओच्या सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोनबद्दल आहे. रिलायन्सकडून AGM च्या व्यासपीठावरून हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोशी व्यवहारासंदर्भातही या बैठकीत घोषणा होऊ शकते.

Reliance Jio आणि Google कडून स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे आज हा फोन लाँच झाल्यास तो देशातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन ठरेल. सध्याच्या घडीला पोको M3 प्रो 5जी हा भारतामधील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी आहे.

रिलायन्स जिओच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत?

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपये इतकी असू शकते. आगामी दोन वर्षात Reliance Jio कडून 150 ते 200 कोटी स्मार्टफोन विकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनवरुन रिलायन्स जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड नेटवर्क प्लॅन वापरता येतील.

संबंधित बातम्या:

Reliance Jio Phone Offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग

Reliance Jio | रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या डिटेल माहिती

Reliance Jio GigaFiber : किंमत, पॅकेज आणि सर्व काही…

(Reliance industries limited RIL share stock price)

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.