Silver Rate : जपून जपून जा रे… पुढे धोका आहे! चांदींतील गुंतवणूक धोक्याची? तज्ज्ञांचा सल्ला आताच का?

Silver Investment: चांदी सोन्याहून सरसर धावली. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार सोन्याऐवजी चांदीत गुंतवणूक करत आहेत. हा आकडा पूर्वीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक आहे.

Silver Rate : जपून जपून जा रे... पुढे धोका आहे! चांदींतील गुंतवणूक धोक्याची? तज्ज्ञांचा सल्ला आताच का?
चांदीतील गुंतवणूक
| Updated on: Sep 19, 2025 | 8:44 AM

चांदीने गेल्या काही दिवसांपासून सोन्यावाणी परतावा दिला आहे. यंदा तर सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला. चांदी या वर्षी झरझर चढली. चांदी सोन्याहून सरसर धावली. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार सोन्याऐवजी चांदीत गुंतवणूक करत आहेत. हा आकडा पूर्वीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक आहे. एरव्ही सोन्यापेक्षा चांदीतील गुंतवणूक निम्म्याहून कमी होती. यंदा गुंतवणुकीचा आकडा दुप्पट झाला आहे. यंदा चांदीच्या किंमतीत 43 टक्के वाढ झाली आहे. तर सोन्याने 37 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत सोनं हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जात होते. पण त्याची जागा आता चांदी घेत आहे. तर आता चांदीत मोठी गुंतवणूक धोक्याची ठरू शकते असे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहे. चांदी अत्यंत अस्थिर असल्याने ती फार काळ उच्चांकावर राहू शकत नाही असा दावा तज्ज्ञांचा आहे.

2011 मध्ये किंमती 50 डॉलरवर

वायदे बाजारात(MCX) चांदीची किंमत प्रति औंस 24.50 डॉलरच्या जवळपास आहेत. 2011 मध्ये ही किंमत प्रति औंस 50 डॉलरेपक्षा अधिक होत्या. भारतात तर वायदे सौद्यांनी प्रति किलो 1,32,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार सोन्याऐवजी चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. सध्या अनेक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीपैकी 20 ते 30 टक्के रक्कम चांदीत गुंतवणूक करत आहे. पूर्वी गुंतवणुकीचा हा आकडा 10 ते 15 टक्क्यांच्या जवळपास होता. म्हणजे आता चांदीतील गुंतवणूक दुप्पट झाली आहे.

चांदी माघारी फिरणार?

चांदी सोन्यापेक्षा अधिक अस्थिर मानण्यात येते. कारण चांदीचा वापर दाग-दागिन्यांपेक्षा औद्योगिक कारणांसाठी अधिक करण्यात येतो. यामुळे बाजारातील चढउतारांचा या धातुवर लागलीच परिणाम दिसतो. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या तेजीनंतर येत्या काही महिन्यात किंमतीचा हा आलेख घसरू शकतो. जागतिक बाजारात चांदीची किंमत प्रति औंस 40 डॉलरच्या जवळपास स्थिर होईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

इंडोनेशिया आणि चिलीतून पुरवठा घटला

सध्या भूराजकीय अस्थिरता दिसून येते. जगावर दोन युद्धाचे सावट कायम आहे. हाच सोने आणि चांदी यांच्या किंमतीवर परिणाम करणारा मोठा घटक आहे. जगभरात चांदीची औद्योगिक कारणासाठी मागणी वाढत आहे. पण सध्या चांदीचा पुरवठा मर्यादीत आहे. विशेषतः इंडोनेशिया आणि चिलीसारख्या देशांतील खाणींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. तर चांदीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत. त्यात यश आले तर चांदीची औद्योगिक मागणी घटण्याची शक्यता आहे.