AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock : या छोटूरामची हनुमान उडी; एकाच वर्षात 1 लाखांचे केले 70 लाख, तुम्ही गुंतवणूक केली का?

Share Market : शेअर बाजारात आता कुठं तरतरी जाणवू लागली आहे. सणावाराचे दिवस आहेत. जीएसटी कपातीची घोषणा झाली आहे. टॅरिफ वॉर कमी होण्याची शक्यता आहे. पण या स्टॉकने त्यापूर्वीच कमाल कामगिरी करून दाखवली आहे.

Penny Stock : या छोटूरामची हनुमान उडी; एकाच वर्षात 1 लाखांचे केले 70 लाख, तुम्ही गुंतवणूक केली का?
गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
| Updated on: Sep 18, 2025 | 4:08 PM
Share

पेनी स्टॉक म्हणून यापूर्वी ओळख असणाऱ्या या शेअरने आता कमाल दाखवली आहे. एलीटकॉन इंटरनॅशनलने (elitecon international) एका वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. एलीटकॉन इंटरनॅशनलचा शेअर गुरुवारी BSE वर 5 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 177 रुपयांवर पोहचला. कंपनीचा शेअर एका वर्षात 6900 टक्क्यांहून अधिकने वधारला. या कंपनीने एका वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 70 लाखांहून अधिकचा परतावा दिला आहे. एलिटकॉन इंटरनॅशनल, सिगारेट आणि टोबॅको उत्पादन इंडस्ट्रीशी संबंधित कंपनी आहे.

1 लाखांचे असे झाले 70 लाख

Elitecon International कंपनीचा शेअर 18 सप्टेंबर 2024 रोजी 2.51 रुपयांवर होता. कंपनीचे शेअर 18 सप्टेंबर 2025 रोजी 177 रुपयांवर पोहचले. या शेअरने एका वर्षात शेअरधारकांना 6951 टक्क्यांचा जोरदार परतावा दिला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य आज 70.51 लाख रुपये इतकी असती.

यंदा 1600 टक्क्यांपर्यंत उसळी

एलिटकॉन इंटरनॅशनलच्या शेअरने यंदा आतापर्यंत 1606 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2025 रोजी 10.37 रुपयांवर होते. कंपनीचा शेअर 18 सप्टेंबर 2025 रोजी 177 रुपयांवर पोहचला. गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 540 टक्क्यांची मोठी रॅली दिसून आली. कंपनीचा शेअर या कालावधीत 27.66 रुपयांहून थेट 177 रुपयांवर पोहचला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 46 टक्क्यांहून अधिकची घसरण पण दिसून आली.

या कंपनीने शेअर स्प्लिट पण केले आहेत. कंपनीने शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजीत केला. मल्टीबॅगर कंपनीने जून 2025 मध्ये 10 रुपयांच्या फेसव्हॅल्यूच्या शेअरला 1-1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 10 शेअरमध्ये विभाजीत केले. या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 59.70 टक्के इतका आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 40.50 टक्के इतकी आहे. एलिटकॉन इंटरनॅशनल, सिगारेट आणि टोबॅको उत्पादन इंडस्ट्रीशी संबंधित कंपनी आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.