PM Kisan Yojana : कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल 21 वा हप्ता, यांना मिळणार भोपळा, एका क्लिकवर घ्या जाणून
PM Kisan Yojana Eligibility Criteria : पीएम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. जाणून घ्या योजनेचा 21 वा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला नाही?

पीएम किसान योजना
PM Kisan Yojana 21st Installment : पीएम किसान योजना देशभरात लोकप्रिय आहे. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकार वर्षाला 6 हजारांची आर्थिक मदत करते. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकार बारीक लक्ष ठेवून असते. त्यासाठी योजनेची पात्रता सूची तयार करण्यात येते. या पात्रता यादीत कोण शेतकरी या योजनेशी जोडलेले आहेत आणि कोण नाहीत, याचा अंदाज येतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत ही सरकार वेळोवेळी असे निकष लावून सरकार पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदत करते.
21 वा हप्ता कोणाला मिळेल आणि कोणाला नाही?
- इतर योजनांप्रमाणे पीएम किसान योजनेतही पात्रता यादी आहे. जे लोक या योजनेसाठी पात्र आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत जर बोगस लोक घुसखोरी करत असतील. तर सरकार अशा बोगस लाभधारकांना हुडकतो आणि त्यांचे अर्ज बाद करतो. त्यामुळे ईकेवायसी करणाऱ्या शेतकऱ्याला लाभ मिळतो.
- जे शेतकरी ई-केवायसीचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करत नाही, त्यांचा 2000 रुपयांचा हप्ता थांबवण्यात येतो. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सीएससी केंद्रावर जाऊन अथवा साईटवर जाऊन लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे जोडा. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतात त्यांना योजनेचा लाभ मिळतो.
- भू-सत्यापन, जमीन पडताळा हे काम या योजनेत शेतकऱ्यांना करावे लागते. जे शेतकरी हे काम करत नाहीत. त्यांना या योजनेतंर्गत कोणताही लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुदतीत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अजून एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. जर हे काम पूर्ण केले नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता थांबविण्यात येतो. जर हे काम अपूर्ण असेल तर ते तातडीने पूर्ण करा. कारण सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करते.
- ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.
