Gold Silver Price Today : खुशखबर, सोन्याने घेतला यू टर्न! भावात झाली इतकी घसरण, चांदी जोरात

Gold Silver Price Today : आगेकूच करताना सोन्याने आज थोडी विश्रांती घेतली. सोन्याने या आठवड्यात तुफान वेग घेतल्याने सर्वांच्याच मनात धडधड वाढली. आता हा भाव 60,000 रुपयांवर जातो की काय, अशा चर्चा दिवसभर रंगल्या.

Gold Silver Price Today : खुशखबर, सोन्याने घेतला यू टर्न! भावात झाली इतकी घसरण, चांदी जोरात
आज मिळाला दिलासा
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : सोन्याच्या लकाकीने अनेकांना घामटा फोडला. या आठवड्यातील तीन दिवसात सोन्याने जी कमाल बॅटिंग केली, तिने भलभले गुंतवणूकदार हवालदिल झाले. सोन्याचा झपाटा पाहता हा भाव 60,000 रुपयांवर जातो की काय, अशा चर्चा दिवसभर रंगल्या. सोमवारपासून सुरु झालेली तुफान एक्सप्रेस आज कुठे जाऊन थांबली. आज सोन्याच्या किंमतींना ब्रेक लागला. सोन्याने गुरुवारी, 16 मार्च रोजी यु-टर्न घेतला. चांदीच्या किंमतीत मात्र आजही तेजी आहे. चांदीने गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा हा परिणाम आहे. सोन्याने मरगळ झटकून महागाईची गुढी उभारली आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price) नवीन रेकॉर्ड केला होता. आता सोने त्याच वळणावर आले आहे.

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड ब्रेक भाव केला होता. त्यानंतर भावात प्रचंड घसरण झाली. सोने आणि चांदीचे दाम घसरले. मध्यंतरी संपूर्ण महिना सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार झाला. पण किंमती एवढ्या सुसाट सुटल्या नाहीत. पण या आठवड्यात या मौल्यवान धातूंनी कमाल केली. ऐन लग्नसराईतील या वेगाने अनेकांना धसका बसला.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

हे सुद्धा वाचा

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

असा झाला बदल

  1. 13 मार्च रोजी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले
  2. सोन्याचा भाव प्रति तोळा 56968 रुपयांवर पोहचला
  3. गेल्या शुक्रवारी सोने 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. त्यावेळी भाव 55669 रुपये होता
  4. मंगळवारी सोने पुन्हा झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला
  5. बुधवारी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली
  6. गुरुवारी सोन्याच्या तेजीला ब्रेक लागला. सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला
  7. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 100, 110 रुपयांची घसरण झाली
  8. चांदीत प्रति किलो 500 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा भाव किलोमागे 69000 रुपये झाला

हे आहेत चार शहरांतील भाव

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,050 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,870 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,050 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,870 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,050 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,870 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 53,080 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,900 रुपये आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....