Sim Swap Bank News | सिम स्वॅप, बँक खाते साफ! हॅकर्सची ही ट्रिक तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Jul 19, 2022 | 9:45 AM

Alert Sim Swap Scam | तुमची कष्टाची कमाई लुटण्यासाठी हॅकर्सनी आणखी एक फंडा शोधून काढला आहे. काय आहे तो फंडा, चला पाहुयात.

Sim Swap Bank News | सिम स्वॅप, बँक खाते साफ! हॅकर्सची ही ट्रिक तुम्हाला माहिती आहे का?
या घोटाळ्यापासून वाचवा बँक खातं
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Sim Swap Account Hack News | तुम्हाला गंडवण्यासाठी आणि साध्या साध्या चुका हेरुन तुमची कष्टाची कमाई लुटण्यासाठी हॅकर्स (Cyber Hackers), सायबर भामटे अनेक फंडे वापरतात. तंत्रज्ञानाला वाकवत खुष्कीच्या मार्गाने तुमच्या बँक खात्यातील (Bank Account) रक्कम हातोहात गायब केल्या जाऊ शकते. प्रगत तंत्रज्ञानाचे (Technology) जसे फायदे आहेत, तसे तोटे ही आहेत. पुरेशी सुरक्षा घेतली नाही तर तुम्हाला चांगलाच चूना लागू शकतो. तेव्हा रहा सावध, होऊ का सावज. तर ऑनलाईन चोरट्यांनी सिम स्वॅप (Sim Swap) ही आणखी एक ट्रिक वापरायला सुरुवात केली आहे. तुमच्या विविध बँकेतील शिल्लक अगदी काही क्षणात या तंत्रज्ञानाचा वापर करुन भूर्रकन उडवण्यात येते. त्याचा फटका देशातील काही जणांना बसला असून तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपासाअंती, पश्चिम बंगालमधून इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून या धक्कादायक तंत्राचा खुलासा झाला आहे. हा घोटाळा नेमका कसा केल्या जातो याची माहिती करुन घेऊयात.

 

सिम स्वॅप स्कॅम म्हणजे काय ?

हा हॅकर्सने सुरु केलेला नवीन व्यवसाय आहे. अनेक फंडे पोलिसांनी हुडकून काढल्याने अथवा नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच हाणून पाडल्याने आता ही हॅकर्स ही ट्रिक वापरतात. यामध्ये हॅकर्स तुमच्या सिमकार्डचे डुप्लिकेट सिम कार्ड तयार करतात आणि तुमची माहिती चोरुन, बँकेतील रक्कम चोरतात.

हे सुद्धा वाचा

 

हा प्रकार ओळखायचा कसा?

तुमचे सिम कार्ड स्वॅप करण्यात आले आहे की नाही, हे ओळखणार कसे? तर हे तुमचा मोबाईलच सांगेल. तुमचा मोबाईल सारखा सिग्नल धरसोड करत असेल. सिग्नलच दिसत नसेल. अथवा सारखे येत जात असेल. तुम्हाला एसएमएस, कॉल करता येत नसेल तर समजून जा की सगळं काही ओक्केमध्ये नाही.

कसा होतो घोटाळा?

यासाठी हॅकर्स फिशिंग तंत्रज्ञानाचा वापर करतात. याद्वारे तुमचा मोबाईल क्रमाक, ई-मेल आयडी, जन्मतारीख आदी माहिती मिळवण्यात येते. त्यानंतर डुप्लिकेट सिम कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यासाठी तुमच्या मोबाईल कंपनीशी संपर्क साधण्यात येतो. कस्टमर केअरकडे संपर्क साधून त्याच क्रमांकाचे दुसरे नवीन सिमकार्ड घेण्यात येते आणि पुढे बँकेतील खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात येते. यालाच सिम स्वॅप म्हणतात.

मग आता तुम्ही काय करणार

हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेचच ग्राहक सेवा, बँक आणि इतर प्राधिकरणांशी संपर्क साधा. सिम काम करत नसेल तर ताबडतोब नेटबँकिंग पासवर्ड बदला आणि बँकेला सर्व व्यवहार थांबवायला सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोनमध्ये सिम इन्स्टॉल करताना नेहमी पिन टाका.

या मोहाला तर अजिबात बळी पडू नका

आकर्षक ऑफर आणि सवलतीच्या मेसेज-ईमेलवर अजिबात क्लिक करू नका. हे एक जाळही असू शकतं. त्याद्वारे फिशिंग हल्ला होऊ शकतो. बहुतांश मजकुरांमध्ये स्पेलिंगच्या चुका असतान कोणत्याही अनोळखी लिंक, वेबसाइट आणि ईमेलवरील अॅट्रॅचमेंट्स ओपन करतानाही खबरदारी बाळगा. तुम्हाला ऑनलाईनचे कोणतेही आमिष नुकसान देऊ शकते.