शरणार्थी म्हणून आले, दूध विकले, मिळेल ते काम केले, कोट्यवधींच्या बँकेचे आज आहेत मालक

Chandrashekhar Ghosh : 1960 मध्ये त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे चंद्रशेखर घोष यांच्या वडिलांची मिठाईची एक छोटी दुकान होती. त्यांचे कुटुंब मूळचे बांगलादेशातील. पण स्वातंत्र्यावेळी हे कुटुंब शरणार्थी म्हणून त्रिपुरामध्ये आले. चंद्रशेखर आज भारतातील एका मोठ्या बँकेचे मालक आहेत.

शरणार्थी म्हणून आले, दूध विकले, मिळेल ते काम केले, कोट्यवधींच्या बँकेचे आज आहेत मालक
हे चंद्रशेखर घोष यांच्या कष्टाचे 'बंधन'
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 4:55 PM

प्रयत्न करणाऱ्याचा पराभव होत नाही, अशी म्हण आहे. जगात असे अनेक लोक आहेत की त्यांनी या ओळीवर यशाला गवसणी घातली आहे. त्यासाठी त्यांना अविरत कष्ट उपसावे लागले. पण त्यांनी यश मिळाल्यानंतर ही कष्टाला सोडले नाही. कधी काळी घरोघरी जाऊन दूध विक्री करणारा मुलगा आज भारतातील मोठ्या बँकेचा मालक आहे. कधीकाळी ही व्यक्ती पै-पै साठी झगडत होती. आज याच व्यक्तीने कित्येक हाताला काम दिले आहे. तर अनेकांना आज बँक कर्ज वितरण करत आहे.

बंधन बँकेचे मालक

बंधन बँकेचे (Bandhan Bank) संस्थापक आणि सीईओ चंद्रशेखर घोष (Chandrashekhar Ghosh) यांनी आयुष्यात अनेक चटके सहन केले आहे. गरिबीने त्यांच्या इच्छेवर, दृढनिश्चियावर अनेकदा पाणी फिरवले. पण ते मागे हटले नाहीत. आज बंधन बँकेचे बाजारातील भांडवल 28997 कोटी रुपये आहे. अनेक टप्प्यावर त्यांनी स्वतःला घडवले आणि आज हा टप्पा गाठला आहे.

हे सुद्धा वाचा

शिकवणी घेऊन केले शिक्षण

लहानपणापासून त्यांना गरिबीने छळले. वडिलांची छोटी मिठाईची दुकान होती. पण कसाबसा घरखर्च भागत होता. आर्थिक तंगीमुळे त्यांना घरोघरी जाऊन दूध विक्री करावी लागत होती. त्यांचे 12 वीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी सांख्यिकी विषयात ढाका विद्यापीठातून 1978 मध्ये पदवी मिळवली. पण शिक्षणाचा आणि स्वतःचा खर्च भागविण्यासाठी त्यांना शिकवणी घ्यावी लागली. ते ब्रोजोनंद सरस्वती आश्रमात राहत होते.

या नोकरीने बदलवले आयुष्य

शिक्षण झाल्यावर त्यांना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नॉन प्रॉफिट ऑर्गेनायझेशनमध्ये (BRAC) नोकरी मिळाली. ही एनजीओ महिलांना आर्थिक मदत करुन त्यांना पायावर उभे करण्यासाठी मदत करत होती. स्वंयसहायता बचत गटासारखे हे प्राथमिक काम होते. त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. भारतात असेच काम करण्याचे ठरवून त्यांनी 1997 साली नोकरी सोडली.

व्हिलेज वेलफेअर सोसायटी

1998 त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1998 मध्ये व्हिलेज वेलफेअर सोसायटी सुरु केले. त्यानंतर 2001 मध्ये बंधन नावाने महिलांना कर्ज देण्यासाठी त्यांनी मायक्रो फायनान्स कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी दोन लाखांची उसनवारी करावी लागली. त्यांनी बंधन नावाने एक स्वयंसेवी संस्था पण सुरु केली. 2002 मध्ये त्यांना सिडबीकडून 20 लाखांचे कर्ज मिळाले. त्यावर्षी बंधन बँकेने जवळपास 1,100 महिलांना 15 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. त्यांच्याकडे त्यावेळी केवळ 12 कर्मचारी होते.

2009 मध्ये एनबीएफसी

  • 2009 मध्ये बंधनला भारतीय रिझर्व्ह बँकेने NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून नोंदणीकृत केले. त्यांनी जवळपास 80 लाख महिलांचे आयुष्य बदलले. वर्ष 2013 मध्ये त्यांनी RBI कडे खासगी बँकेसाठी अर्ज दाखल केला. 2015 मध्ये त्यांना बँकिंग परवाना मिळाला. त्यातून बंधन बँक अस्तित्वात आली.
  • बंधन बँकेचे बाजारातील भांडवल आज 28997 कोटी रुपये आहे. बंधन बँकेच्या संकेतस्थळानुसार, बंधन बँकेच्या ग्राहकांची संख्या 3.26 कोटी रुपये आहे. 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तिच्या शाखा आहेत. तर 6262 इतके आऊटलेट आहेत.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.