महागाईचा आणखी एक झटका! खाण्यापिण्यानंतर आता साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढल्या; पण कितीने?

Detergent Price Hike: महागाईचा डबल झटका बसणार आहे. खाण्यापिण्यानंतर आता डिटर्जंटही महागले आहे. HUL ने दर वाढवले आहेत.

महागाईचा आणखी एक झटका! खाण्यापिण्यानंतर आता साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढल्या; पण कितीने?
| Updated on: Oct 07, 2026 | 8:37 PM

देशात महागाई सातत्याने वाढत आहे. अन्न आणि दैनंदिन वस्तू या दोन्हींच्या किमती सातत्याने वाढत आहेत. नुकतेच हिंदुस्थान युनिलिव्हरने ऑक्टोबर महिन्यात व्हील्स, सर्फ एक्सेल आणि रिन यांसारख्या आपल्या लोकप्रिय डिटर्जंट ब्रँडच्या अनेक पॅकेट्सच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. कंपनीने विविध उत्पादनांच्या किमती २.२% ते ७.१% ने वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक उत्पादनांच्या किमती या वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्यांदा वाढवण्यात आल्या आहेत.

कंपनीने व्हील पावडरच्या १ किलो पॅकेटची किंमत ₹९० वरून ₹९३ पर्यंत वाढवली आहे. ५००-ग्रॅम पॅकेटची किंमत ₹४६ वरून ₹४७ झाली आहे. सर्फ एक्सेल इझी वॉशच्या १ किलोच्या पॅकेटची किंमत आता १६७ रुपयांवरून १७२ रुपये झाली आहे. ५०० ग्रॅमच्या पॅकेटची किंमतही ८५ रुपयांवरून ८७ रुपये करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त रिन आलाच्या ५०० मिली पॅकची किंमत ₹९० वरून ₹९५ करण्यात आली आहे.

Loading...

रिन आला पावडरच्या १ किलो पॅकेटची किंमत पूर्वीच्या ₹१२० वरून आता ₹१२३ झाली आहे. ५०० ग्रॅम पॅकेटची किंमत ₹६१ वरून ₹६३ करण्यात आली आहे. मात्र, एचयूएलने आपल्या डिटर्जंट उत्पादनांच्या किमती वाढवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी कंपनीने व्हील पावडरची किंमत ₹10 ने वाढवली होती. यावर्षी सर्फ एक्सेलच्या किमतीतही अंदाजे ₹11 ने वाढ झाली आहे. रिनच्या किमतीतही यावर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. व्हील, रिन आणि सर्फ एक्सेल हे सर्वसामान्य डिटर्जंट आहेत. त्यामुळे भाववाढीचा कुटुंबांच्या मासिक बजेटवर थेट परिणाम होऊ शकतो.

जे कुटुंबे नियमितपणे मोठी पॅक खरेदी करतात, त्यांना याचा विशेष फटका बसेल. याचा अर्थ असा की, येत्या काही दिवसांत कपडे धुण्याच्या उत्पादनांवरील घरगुती खर्चात किंचित वाढ होऊ शकते. डिटर्जंटच्या वाढत्या किमतींचे मुख्य कारण कच्च्या मालाचा आणि पॅकेजिंगचा वाढता खर्च हे मानले जाते. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पाम तेलाच्या किमतीत अंदाजे २०-३०% वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त पॅकेजिंगचा खर्च अंदाजे ५०% वाढला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि मध्य पूर्वेतील तणावाचाही खर्चावर परिणाम झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us