टाटा मोटर्सचा बँक ऑफ इंडियासोबत वाहन वित्तविषयक करार, ग्राहकांना मिळणार जबरदस्त सुविधा

यापूर्वी टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इक्विटास एसएफबीसोबत असाच करार केला होता. ही ऑफर देशभरातील नवीन ICE कार, SUV आणि वैयक्तिक विभागातील इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होईल. टाटा मोटर्सच्या कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

टाटा मोटर्सचा बँक ऑफ इंडियासोबत वाहन वित्तविषयक करार, ग्राहकांना मिळणार जबरदस्त सुविधा
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 6:28 PM

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने बँक ऑफ इंडियासोबत रिटेल फायनान्स सामंजस्य करार केलाय. या कराराअंतर्गत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहन ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा सुविधेचा पर्याय असेल. या करारानुसार, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना 6.85 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने वाहन कर्ज देईल. या सुविधेअंतर्गत वाहनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा सुविधा उपलब्ध असेल. यामध्ये एक्स-शोरूम किंमत तसेच विमा आणि नोंदणीचा ​​खर्च समाविष्ट असेल. यासोबतच त्यावर ईएमआय सुविधाही मिळणार आहे. या अंतर्गत 7 वर्षांच्या कालावधीत 1502 रुपये प्रति लाख या दराने हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड केली जाऊ शकते.

विविध सवलती

यापूर्वी टाटा मोटर्सने लहान व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इक्विटास एसएफबीसोबत असाच करार केला होता. ही ऑफर देशभरातील नवीन ICE कार, SUV आणि वैयक्तिक विभागातील इलेक्ट्रिक वाहनांवर लागू होईल. टाटा मोटर्सच्या कार खरेदीदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरमध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

टाटा ईव्ही स्पेसमध्ये झपाट्याने वाढ

कंपनीने नुकतेच त्याचे निकाल सादर केले होते. त्यानुसार या तिमाहीत कंपनीला 4,415.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 307.3 कोटी रुपये होता. त्याच वेळी, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 61,378.8 कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 53,530 कोटी रुपये होते. सध्या, हा स्टॉक NSE वर रु. 13.40 (2.67%) च्या वाढीसह 515.40 च्या पातळीवर दिसत आहे.

देशभरात 22 हजार इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटसची उभारणी

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) संख्या वाढत आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे (Petrol Diesel Prise Hike) वाहनचाकलांकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारही इंधनावरचा भार कमी करून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यासाठी विविध उपययोजनाही केल्या जात आहेत. आता केंद्र सरकारने त्यापुढे जात देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग पॉईंटस उभारण्याची योजना खाली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या HPC, BPCL आणि IOC देशात 22 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करतील. BPCL देशात 7000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचवेळी, HPCL 5000 आणि IOC एकूण 10,000 EV चार्जिंग स्टेशन उभारेल. अनेक रस्ते आणि मार्केटमध्ये चार्जिंग पॉइंट बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपांनाही त्यांच्या कॅम्पसमध्ये ई-वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम (EV) जारी, जाणून घ्या सर्वकाही

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.