टाटाचं टॉप मॉडेल लवकरच बाजारात, फोटो लीक

मुंबई : टाटा मोटोर्स Tiago चा नवीन मॉडेल ‘Tiago XZ+’ लवकरच लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. Tiago XZ+ सध्याचा टॉप मॉडल XZ पेक्षाही वर आपली जागा बनवेल असे बोललं जात आहे. ही नवीन गाडी 12 डिसेंबरला लाँच होणार असून त्याआधीच गाडीचे फोटो आणि माहिती समोर आली आहे. नवीन टीयागोच्या एक्सटीरियरमध्ये खूप काही नवीन …

मुंबई : टाटा मोटोर्स Tiago चा नवीन मॉडेल ‘Tiago XZ+’ लवकरच लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. Tiago XZ+ सध्याचा टॉप मॉडल XZ पेक्षाही वर आपली जागा बनवेल असे बोललं जात आहे. ही नवीन गाडी 12 डिसेंबरला लाँच होणार असून त्याआधीच गाडीचे फोटो आणि माहिती समोर आली आहे.
नवीन टीयागोच्या एक्सटीरियरमध्ये खूप काही नवीन फीचर असणार आहेत. यामध्ये टाटा टिगोल सारखे नवीन ब्लॅक-आऊट प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि 15 इंचाची ड्यूअल-टोन अलॉय व्हील असेल. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फोल्ड होणारी आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर, बॉडी साईड मोल्डिंग आणि मागे टेलगेटवर क्रोम फिनिश असेल. याशिवाय ही गाडी दोन नवीन रंग कॅनॉन ऑरेंज आणि ओशियन ब्लूमध्ये मिळणार आहे.
इंटीरियर
टाटा टियागोच्या नवीन टॉप मॉडेलचे इंटीरियरही इतर गाड्यांपेक्षा छान आहे. यामध्ये 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे अँड्रॉईड आटो आणि वॉयस कमांडवर चालते. तसेच एसीसाठी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर मिळेल.
इंजिन आणि किंमत
Tiago XZ+ मध्ये तांत्रिक काही बदल केलेले नसून 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 85hp एवढे पॉवर जनरेट करते. तर 1.5 लीटर डिझल 70hp पॉवर जनरेट करते. दोन्ही इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत आहे. या मॉडेलची किंमत सध्याच्या टॉप मॉडेलपेक्षाही 35 हजार ते 50 हजारांपेक्षा जास्त असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *