टाटाच्या या कंपनीचे सीईओ क्रितिवासन यांनी पगार म्हणून घेतले तब्बल इतके कोटी

देशातील सर्वात मोठा ग्रुप टाटा कंपनीच्या टीसीएस कंपनीचे सीईओ क्रितीवासन यांनी या आर्थिक वर्षात तब्बल इतक्या कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक वाढ 5.5 टक्क्यांपासून ते आठ टक्क्यांपर्यंत दिली आहे तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दुहेरी अंकी वेतन वाढ मिळाली आहे.

टाटाच्या या कंपनीचे सीईओ क्रितिवासन यांनी पगार म्हणून घेतले तब्बल इतके कोटी
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 7:09 PM

TCS CEO Salary : भारतात अनेक अशा कंपन्या आहेत जे आपल्या कर्मचाऱ्यांना भरपूर पगार देतात. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक के क्रितिवासन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार घेतला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली. राजेश गोपीनाथन हे TCS मधून अचानक बाहेर पडल्यानंतर कृतीवासन यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. TCS च्या वार्षिक अहवालानुसार, कृतिवासन यांनी गेल्या आर्थिक वर्षात 3.08 कोटी रुपयांच्या लाभ आणि भत्त्यांसह 1.27 कोटी रुपये पगार मिळवला आणि त्यांना 21 कोटी रुपयांचे कमिशन देखील मिळाले आहे.

कमिशन म्हणून 21 कोटी

कृतिवासन यांच्या उत्पन्नात TCS च्या सर्वात मोठ्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा शाखेचे जागतिक प्रमुख म्हणून त्यांचे मानधन देखील समाविष्ट आहे. विशेष म्हणजे कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) एनजी सुब्रमण्यम यांनी गेल्या आर्थिक वर्षात २६.१८ कोटी रुपये कमावले होते. कंपनीतून लवकरच निवृत्त होणारे सुब्रमण्यम हे वर्षभर या पदावर होते. त्यांना 1.72 कोटी रुपये वेतन आणि लाभ आणि भत्ते म्हणून 3.45 कोटी रुपये आणि कमिशन म्हणून 21 कोटी रुपये मिळाले होते.

कर्मचाऱ्यांपेक्षा 346 पट जास्त पगार

कंपनीच्या सीओओचे मानधन त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी मानधनाच्या 346.2 पट आहे. 31 मार्च 2024 पर्यंत एका कर्मचाऱ्याचे सरासरी वेतन 6,01,546 रुपये होते. अहवालात असे म्हटले आहे की सरासरी वार्षिक वाढ 5.5 टक्क्यांपासून ते आठ टक्क्यांपर्यंत आहे तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दुहेरी अंकी वेतन वाढ मिळाली आहे. कंपनीने म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या अखेरीस, त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी 35.6 टक्के महिला होत्या. कंपनीचे सुमारे 55 टक्के कर्मचारी पूर्णपणे कार्यालयात काम करत आहेत.

टाटा कंपनी देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. टाटा अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. टाटा कंपनीने आतापर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे पगार दिले आहेत.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.