मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 46 लाख लोकांकडून लाभ, फक्त 55 रुपये जमा करून मिळवा 36 हजार

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. खाते उघडण्याच्या वेळी तुम्ही नामनिर्देशित व्यक्ती देखील प्रविष्ट करू शकता.

मोदी सरकारच्या 'या' योजनेचा 46 लाख लोकांकडून लाभ, फक्त 55 रुपये जमा करून मिळवा 36 हजार
cash

नवी दिल्लीः प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) पेन्शन योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे 46 लाख कामगारांनी नोंदणी केलीय. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिलीय. मासिक पेन्शनच्या स्वरूपात वृद्धावस्थेत सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान आश्वस्त मासिक 3000 रुपये पेन्शन दिली जाईल. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत असंघटित क्षेत्रातील एकूण 45,77,295 कामगारांनी योजनेअंतर्गत नोंदणी केलीय.

55 ते 200 रुपयांपर्यंत हप्ता असेल

या योजनेत विविध वयोगटानुसार 55 ते 200 रुपये मासिक योगदान देण्याची तरतूद आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये योगदान द्यावे लागेल. त्याच वेळी 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

अशी करा नोंदणी

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. खाते उघडण्याच्या वेळी तुम्ही नामनिर्देशित व्यक्ती देखील प्रविष्ट करू शकता.

उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यामध्ये गुंतवणुकीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे. याशिवाय बँकेला संमतीपत्र द्यावे लागेल. जे मजूर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करणाऱ्या मजुराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे. कोणताही मजूर कामगार विभाग, LIC, EPFO ​​च्या कार्यालयात जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही www.maandhan.in ला भेट देऊ शकता किंवा हेल्पलाइन क्रमांक 14434 वर कॉल करू शकता.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ही योजना केवळ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच लागू असेल. यामध्ये घरकाम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, ड्रायव्हर, प्लंबर, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, चिंधी वेचणारे, विडी बनवणारे, हातमाग, शेती कामगार, मोची, धुलाई, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.

त्यांना फायदा होणार नाही

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य किंवा आयकर भरणारे सदस्य या योजनेसाठी पात्र नाहीत.

संबंधित बातम्या

दरमहा 3300 रुपये जमा करून मिळवा 9 कोटी, जाणून घ्या कसे?

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, आता बिल्डरांच्या मनमानीला बसणार चाप

Published On - 11:00 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI