
Bitcoin decline: गेल्या एका महिन्यात ग्लोबल क्रिप्टो बाजारात भयावह घसरण दिसून आली. संपूर्ण बाजाराचे मूल्य ऑक्टोबरपासून आतापर्यंत जवळपास 3 ट्रिलियन डॉलरने कमी झाले आहे. भारतीय चलनानुसार गुंतवणूकदारांसह क्रिप्टो बाजाराला 100 लाख कोटींचा रुपयांचा फटका बसला आहे. ऑक्टोबरमध्ये क्रिप्टो बाजाराचे मूल्य 4.28 ट्रिलियन डॉलरच्या जवळपास होते. ते आता घसरून 2.95 ट्रिलियन डॉलरवर घसरले आहे. क्रिप्टो बाजारातील जवळपास सर्वच चलनांमध्ये मोठी घसरण आली आहे. सर्वाधिक फटका बिटकॉईनला बसला आहे. एका महिन्यात बिटकॉईनमध्ये भूकंप आला आहे.
बिटकॉईन गुंतवणूकदारांना 34 लाखांचा फटका
आता सर्व क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनचा वाटा जवळपास 58% आहे. इथेरियम 12% आणि इतर सर्व क्रिप्टोकरन्सी मिळून केवळ 30% वाटा उरला आहे. गेल्या एका महिन्यात बिटकॉईनच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी बिटकॉईन उच्चांकी स्तरावर 1.10 कोटी रुपयांपर्यंत पोहचला. पण आता बिटकॉईन घसरुन केवळ 76 लाख रुपयांवर आला आहे. एका महिन्यात 34 लाख रुपये म्हणजे 30% अधिकची मोठी घसरण आली आहे. बिटकॉईनसह इथेरियम आणि सोलाना सारख्या दुसऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सी पण आपटल्या आहेत. इथेरियम 4.15 लाख रुपयांहून घसरून थेट 2.48 लाख रुपयांवर आला आहे.
घसरणीचे कारण काय?
जगातील अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दराबाबत मोठी साशंकता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी क्रिप्टोमध्ये विक्रीचे सत्र आरंभले आहे. अनेक जणांनी कर्ज खरेदी करून बिटकॉईन खरेदी केले आहे. त्यामुळे बिटकॉईन घसरण झाली की लागलीच विक्रीचे सत्र सुरू होते. नफा काढून अनेक जण बँकेचे कर्ज फेडतात. हा विक्रीचा धडाका सुरुच आगहे. ओवेन गुंडेन संस्थेने 21 ऑक्टोबर 2025 पासून आतापर्यंत 11,000 बिटकॉइन विक्री केले आहे. त्यावेळी त्याची किंमत जवळपास 1.3 लाख कोटी रुपये होती. नफा कमावून अनेकजण बाजाराबाहेर पडले आहेत.
बिटकॉईन काय आहे?
Bitcoin हे डिजिटल सोने आहे. या डिजिटल चलनावर बँका अथवा सरकारचे कोणतेही नियंत्र नाही. हे पूर्णपणे स्वतंत्र आणि विकेंद्रीकरण चलन आहे. बिटकॉईन हे काही नाणं अथवा नोट नाही. तर एक डिजिटल कोड आहे. तुमच्या मोबाईल अथवा संगणकातील डिजिटल वॉलेटमध्ये ते असतात. इंटरनेटच्या युगात केव्हा आणि कितीही ते अगदी सेकंदात पाठवता येते.