Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Population Control : ऐकावे ते नवलच! या देशामुळे जगाची लोकसंख्या आली आटोक्यात! ही राष्ट्रे आहेत मोठी ग्राहक

Population Control : या देशाचे तर सर्व जगाने खरं तर आभार मानायला हवे. कारण या देशामुळेच पृथ्वीवरील लोकसंख्येचा भार कमी झाला आहे.

Population Control : ऐकावे ते नवलच! या देशामुळे जगाची लोकसंख्या आली आटोक्यात! ही राष्ट्रे आहेत मोठी ग्राहक
ऐकावे ते नवलच
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली : ऐकावे ते नवलच, असा हा मामला आहे. पण या देशामुळे पृथ्वीवरील लोकसंख्येचा भार (Control Of World Population) कमी झाला हे मात्र नक्की. आता तुम्ही म्हणाल असं कोणतं महान कार्य या देशानं केलं बरं. या देशानं काही औषध तयार केलं आहे की काय? अमेरिका, चीन (America, China) या सारख्या मोठ्या अर्थव्यवस्था या देशाचे ग्राहक आहेत. आता तर तुम्हाला धक्काच बसला असेल, नाही का? कारण या दोन्ही देशात सुईपासून ते सॅटेलाईटपर्यंत सर्वच तर तयार होतं. त्यामुळे हे देश एखाद्या देशाचे एवढे मोठे ग्राहक कसे होऊ शकतात, असे वाटणं साहिजकचं आहे. चला तर हा देश असं काय वस्तू तयार करतो, ते जाणून घेऊयात..

थायलंडची जादू थायलंड म्हटल्यावर स्वस्तातील पर्यटन, मज्जा, समुद्र सफारी आणिक काय काय डोळ्यासमोर उभं राहतं, नाही का? त्यातच बँकाँक, पटाया आणि फुकेट या सारख्या पर्यटन स्थळाविषयी तर भारतीयांना मोठं आकर्षण आहे. भारतातून दरवर्षी लाखो पर्यंटक थायलंडला फिरण्यासाठी जातात. पण एवढीच थायलंडची ओळख नाही. जगाची लोकसंख्या कमी करण्यात पण थायलंडची मुख्य भूमिका आहे. कारण, थायलंड जगातील सर्वात मोठा कंडोम निर्यातक आहे.

नैसर्गिक रबराची कृपा जगात सर्वाधिक नैसर्गिक रबराचे उत्पादन थायलंडमध्ये होते. येथील वाणिज्य मंत्रालयानुसार, 2022 मध्ये थायलंड जगातील सर्वात मोठा कंडोम एक्सपोर्टर होता. जगातील एकूण कंडोम एक्सपोर्टमध्ये या देशाचा हिस्सा 44 टक्के आहे. तर 2021 मध्ये हा वाटा 43.7 टक्के होता.

हे सुद्धा वाचा

चीन, अमेरिका सर्वात मोठे आयातदार थायलंडच्या वाणिज्य मंत्रालयानुसार, त्यांनी 2022 मध्ये 27.23 कोटी डॉलरच्या (जवळपास 2225.90 कोटी रुपये) कंडोमची विक्री केली आहे. थायलंडमधून सर्वाधिक कंडोमची निर्यात चीन आणि नंतर अमेरिकेला करण्यात येते. व्हिएतनाम हा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

कंडोम, फळ विक्री जोरात थायलंडची अर्थव्यवस्था पर्यटन, फळ विक्री आणि कंडोम निर्यातीवर अवलंबून आहे. थायलंडमधील एक प्रकारचे फळ जगात सर्वाधिक विक्री होते. 2022 मध्ये थायलंडने 3.22 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 26,322 कोटी रुपयांचे ड्युरियन या फळाची विक्री केली होती.

रबर निर्यात थायलंडमध्ये रबर आणि फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तसेच त्याची निर्यात पण होते. पण तरीही थायलंडच्या एकूण निर्यातीत रबर आणि फळाचा वाटा केवळ 10 टक्के आहे. जागतिक मागणी घटली असली तरी थायलंड सरकार विक्री, निर्यातीसाठी विविध योजना आखत आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.