AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulses Inflation : टोमॅटो नंतर डाळी पण रडवणार, भाव इतके भडकणार

Pulses Inflation : महागाईने पाकिस्ताननंतर भारतावर अधिक्रमण केले आहे. गेल्या दोन महिन्यात सोने-चांदीत दरवाढ न होता, इतर सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाने तर शंभरी पार केली आहे. आता भाजीपालाच नाही तर डाळींनी पण असहकार पुकारला आहे.

Pulses Inflation : टोमॅटो नंतर डाळी पण रडवणार, भाव इतके भडकणार
| Updated on: Jul 09, 2023 | 10:13 AM
Share

नवी दिल्ली : महागाईने (Inflation) पाकिस्ताननंतर भारतावर अधिक्रमण केले आहे. गेल्या दोन महिन्यात सोने-चांदीत दरवाढ न होता, इतर सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाने तर शंभरी पार केली आहे. आता भाजीपालाच नाही तर डाळींनी पण असहकार पुकारला आहे. टोमॅटो 160 रुपये किलोच्या पुढे विक्री होईल हा कोणी विचार तरी केला होता का? कांदा, आलू, अद्रक, मिरची आणि ही यादी वाढतच चालली आहे. नवनवीन खेळाडू या यादीत दाखल होत आहे. येथे पक्षांतर बंदी कायदा लागू नाही. आता या यादीत डाळींनी वरचा क्रमांक लागणार आहे. डाळीच्या किंमती (Pulses Price) भडकणार आहेत. महागाईने जनता अगोदरच होरपळली आहे. आता त्यांचं जगणं अवघड होणार आहे.

डाळी महागणार लहरी निसर्गाचा मोठा फटका गेल्या वर्षांपासून मानव जातीला बसत आहे. तापमान वाढीमुळे, वायू उत्सर्जनामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचा परिणाम अवकाळी पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही भागात पावसाने थांबाच न घेतल्याने पीकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. पेरणीत 31 ते 60 टक्के कमतरता आली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह इतर धान्याच्या किंमती दुहेरी शतक मारण्याच्या तयारीत आहेत.

यामुळे बसेल फटका

  1. उडद आणि तूर डाळीच्या किंमती भडकणार
  2. अनेक राज्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी तडी
  3. पाऊस पडण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा 30 ते 40 टक्क्यांवर
  4. पेरण्या रखडण्याची भीती, दुपार पेरणीचे संकट, तर पेरणी होऊन पीक जळण्याची पण भीती
  5. डाळीच्या किंमती दुहेरी शतकाच्या तयारीत
  6. RBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता. त्यामुळे महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार

पेरण्या रखडल्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तरीही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात चिखलच चिखल झाल्याने शेतकऱ्यांना कामास अडचणी येत आहे. तर काही ठिकाणी शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या याच कालावधीत गेल्यावर्षीपेक्षा 8.6 टक्के एकरावरच पेरणीचे चित्र आहे. काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे. देशात 101 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. शुक्रवारपर्यंत 35.34 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पीकांसाठी योग्य पावसाची गरज आहे.

तूर चिंतातूर तूरीच्या डाळीने चिंता वाढवली आहे. ही डाळ दररोज वापरात येते. यंदा तूरीच्या पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ 0.6 दशलक्ष हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. तर गेल्यावर्षी 1.5 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

उडीद ही कमी उडीदाची पेरणी यावेळी केवळ 0.48 दशलक्ष हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे प्रमाण 31.43 टक्क्यांनी घसरले आहे. भातशेतीवर पण परिणाम झाला आहे. पंजाब वगळता, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने डाळी आणि तांदळाच्या पेरण्यांवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निसर्गाचा चमत्कार दिसला नाही तर महागाईचा मार बसेल.

किंमतीत इतकी उसळी

  1. सध्या तूर डाळीचा सरासरी भाव प्रति किलो 133 ते 137 रुपयांच्या घरात आहे.
  2. शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
  3. तर तूर डाळीचा भाव 200 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  4. उडीदाची डाळ 110-115 रुपये किलो दरम्यान आहे.
  5. शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
  6. उडदाची डाळ 130-150 रुपयांपर्यंत भाव वाढू शकतात.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका