नवी दिल्ली : भारतीय रुपयाने (Rupee) कात टाकली आहे. आंतरराष्ट्रीय चलन (International Currency) होण्यासाठी रुपयाची आगेकूच सुरु आहे. जगातील अनेक मोठे देश भारतासोबत व्यापारासाठी रुपयाला प्राधान्य देत आहे. डॉलर (Dollar) या व्यापारात कुठेच नाही. डॉलरच्या दांडगाईला अशाप्रकारे भारत उत्तर देण्याच्या तयारीत आहे. जवळपास 18 देशांनी रुपयांत व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. रुपयातून दुसऱ्या देशात व्यापार करता यावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आघाडी घेतली आहे. त्यासाठी वोस्ट्रो खाते उघडण्यात येत आहे. जवळपास 18 देशांनी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (Vostro Account) उघडण्यात आले आहेत. या देशांसोबतच आता इतर अनेक मोठ्या देशांनी पण व्यवहारासाठी रुपयाला पसंती दिली आहे.