भारतातील या राज्यात होते सर्वाधिक सोने खरेदी, एका व्यक्तीकडे इतके सोने

भारतात सोने केवळ दागिने नाही, तर एक गुंतवणूक आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग मानला जातो. अलिकडच्या वर्षात गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचा कल वाढला आहे.

भारतातील या राज्यात होते सर्वाधिक सोने खरेदी, एका व्यक्तीकडे इतके सोने
gold
| Updated on: May 14, 2026 | 7:15 PM

Gold Consumption in India : भारतात सोने केवळ दागिने घालून मिरवण्यापूरते नाही, परंतू ते बचत, अडी काडीला मदत म्हणून गुंतवणूकीसाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतिक देखील मानले जाते. लग्नं, उत्सव आणि कोटुंबिक परंपरांमुळे देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. भारतात अंदाजे वर्षाला सुमारे ७०० ते ८०० टन सोने खरेदी केली जाते. ज्यामुळे भारत देशातील सर्वात मोठ्या सोने ग्राहकांपैकी एक आहे. भारतात दक्षिणेकडील राज्यात सोन्याची जास्त खरेदी केली जाते. येथील महिला मोठ्या प्रमाणात सोने – ज्वेलरी खरेदी करतात. या लेखात पाहूयात भारतात दर वर्षी किती सोने खरेदी होते आणि कोणत्या राज्यात जास्त सोने खरेदी होते.

भारतात सोन्याचा खप

भारतात सोन्याचा खप सतत वाढत आहे. World Gold Council च्या आकडेवारीनुसार देशात सोन्याच्या मागणीत वाढ दिसत आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत (Q1) भारता एकूण सोन्याची मागणी १० टक्के वाढून १५१ टनापर्यंत पोहचली आहे. तर याच्या किंमतीच्या आधारावर मागणी ९९ टक्के वाढून २,२७५ अब्ज रुपयांच्या ( २५ अब्ज डॉलर )रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. दर वर्षी देशात सुमारे ७०० ते ८०० टन सोन्याचा खप होत आहे.

गुंतवणूकीच्या उद्देश्याने सोन्याच्या खरेदी सर्वाधिक वाढ नोंदली आहे. जेथे इन्व्हेस्टमेंट डिमांड ५४ टक्के वाढून ८२ टन झाली आहे. सोन्याची बिस्कीटे आणि नाण्यांची मागणी ६२ टन राहिली आहे. जी दागिन्यांच्या मागणी एवढीच ६६ टन एवढी होती. मात्र, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत १९ टक्के घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तरीही गुंतवणूक आणि ETF मधील रेकॉर्ड नुसार एकूण मागणी मजबूत राहिली. भारतात सोने कुठे जास्त खरेदी केले जाते, याची आकडेवारी सी.ए.विजय जोशी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

भारतात प्रत्येक व्यक्तीकडे किती सोने ?

सोने एक असे क्षेत्र आहे जेथे प्रति व्यक्ती आयातीत खूप कमी घसरण पाहायला मिळत आहे. FY20 मध्ये प्रति व्यक्ती सोन्याची आयात ०.५४ किलोग्रॅम होती, जी FY25 मध्ये घटून ०.५३७ किलोग्रॅम राहिली होती. म्हणजे यात केवळ ०.७ टक्क्यांची कमी झाली होती. यानंतरही भारताचे एकूण सोने आयातीचे बिल FY26 वाढून रेकॉर्ड पातळीवर ७२ अब्ज डॉलरवर पोहचले आहे. भारतात सरासरी एक व्यक्ती वार्षिक ०.५ ते ०.६ ग्रॅम सोने विकत घेतो.

या राज्यात आहे सर्वाधिक सोने

तामिळनाडु    ~28.3%

आंध्र प्रदेश      ~21.6%

तेलंगणा        ~17.5%

कर्नाटक       ~16.1%

गुजरात        ~13.7%

केरळम       ~13.1%

दक्षिणेतील राज्यांचा दबदबा

दक्षिण भारतीय महिलांकडे भारतातील घरगुती स्वर्ण भंडाराचा जवळपास ४० टक्के हिस्सा आहे. या संपत्तीचा सुमारे ७५ ते ८० टक्के भाग ज्वेलरीच्या रुपात राखला जातो. घरगुती स्तरावर सोन्याचे एकूण मुल्य ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे, जे भारताच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBD च्या नियमांनुसार विवाहित महिलांना ५०० ग्रॅम , अविवाहित महिलांना २५० ग्रॅम आणि पुरुषांना १०० ग्रॅम पर्यंत सोने बाळगण्याची अनुमती आहे.

 

Follow Us