
भारतासह जगभरातील लोकांच्या किचनमध्ये जाऊन बसलेली टपरवेअर ( Tupperware ) ही प्लास्टीकचे कंटेनर आणि डब्बे बनवणारी कंपनी तिच्या गुणवत्तेसाठी ओळखली जात होती. पादर्शक हवाबंद डब्यात अन्नपदार्थ जसेच्या तसे रहायचे आणि डबे टीकायचे देखील भरपूर वर्षे. पण हा टीकाऊपणाच कंपनीच्या प्रगतीच्या आड आला आणि एवढी मोठी कंपनी बंद पडली !
टपरवेअर या कंपनीने सुरुवातीला आपल्या ग्राहकांना वादा केला होता की एकदा खरेदी करा, आणि आयुष्यभर वापरा ! कंपनीने हे आश्वासन पूर्ण तर केले. परंतू हे आश्वासनचे हळूहळू कंपनीच्या व्यवसायातील सर्वात मोठी चूक ठरली. कारण हे कंटेनर इतकी मजबूत निघाले की ग्राहकांना नवीन प्रोडक्टची गरजच लागली नाही. त्यामुळे विक्री थांबली आणि नफ्याचे गणित बिघडले.
एकेकाळी किचनीची शान असलेली ही कंपनी आता बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. १९४० च्या दशकात अमेरिकेत सुरु झालेली ही कंपनी एकेकाळी सर्वांच्या तोंडी होती. ‘टपरवेअर पार्टी’चा कॉन्सेप्ट त्याकाळी प्रचंड यशस्वी झाला. महिला घरात एकत्र होऊन कंपनीच्या डब्यांचे प्रदर्शन आणि विक्री करायच्या. टपरवेअरची ओळख कधीही खराब न होणारे उत्पादन अशी बनली. परंतू काळ बदलला. ग्राहकांचा व्यवहार बदलला. तेच मजबूत प्रोडक्ट कंपनीच्या कमजोर बिझनस मॉडेल सिद्ध झाले.
जेव्हा टपरवेअरच्या जुन्या कंटनेरचे आयुष्य प्रचंड असल्याने लोकांना नवीन कंटेनर आणि डब्यांची खरेदी करावी लागली नाही. त्याच वेळी बाजारात स्वस्तातले प्लास्टीक स्टोरेज बॉक्सच्या नवनवीन कंपन्या आल्या. लोकांना वाटले जर स्वस्तात मिळत आहे तर महागड्या टपरवेअरची गरज काय ? टपरवेअरने बदलत्या ट्रेंड नुसार आपल्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला नाही ना नव्या उत्पादनात गुंतवणूक केली.
डिजिटल युगात कंपनीचे अन्य ब्रँड्सनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विक्री जोरात सुरु केली. त्यावेळी टपरवेअर जुन्या डायरेक्ट सेल्स मॉडेलवर अडून राहिली. त्यामुळे तिची पारंपारिक ‘पार्टी सेलिंग’ रणनिती सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सच्या युगात जुनी वाटू लागली. त्यामुळे कंपनी डिजिटल मार्केटिंगच्या शर्यतीतही मागे राहिली आणि स्वस्तातल्या उत्पादनांनी मार्केट कॅप्चर केले.