बाजारातील या छोट्या पहिलवानांनी दाखवली कमाल, गुंतवणूकदार मालामाल

Penny Stock | शेअर बाजार त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. या लाटेत पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना झोळी भरुन परतावा दिला. 100 रुपयांच्या आतील या पेनी स्टॉकने ना भूतो ना भविष्यती परतावा दिला आहे. बीएसई आणि एनएसईने नवीन विक्रम केला आहे. त्याचा गुंतवणूकदारांना आता फायदा होत आहे.

बाजारातील या छोट्या पहिलवानांनी दाखवली कमाल, गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 2:15 PM

नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : शेअर बाजार सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे. या वर्षाच्या अखेरीला शेअर बाजाराने अनेक रेकॉर्ड इतिहासजमा केले. गेल्या दहा वर्षांत बाजाराने मोठी झेप घेतली आहे. 22,000 अंकावरुन आता निर्देशांक 71,000 अंकांच्या पुढे गेला आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या स्टॉकऐवजी लहान स्टॉकवर डाव लावत आहे. शेअर बाजार सध्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. 100 रुपयांच्या आतील या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. यामधील अनेक स्टॉक्स सरकारी कंपन्यांचे आहे. त्यांनी बंपर रिटर्न दिले. या स्टॉकने या वर्षात इतका परताव दिला आहे.

या पेनी स्टॉक्सने केले मालामाल

  1. IRFC – या वर्षात भारतीय रेल्वेचा पेनी स्टॉक IRFC ने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला. एका वर्षात या स्टॉकने 187.84% परतावा दिला. या स्टॉकचा 52 आठवड्यात 25.40 रुपयांवर होता. तो आता 94.70 रुपयांवर पोहचला आहे.
  2. IREDA – अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपनी IREDA चा शेअर नुकताच बाजारात सूचीबद्ध झाला आहे. एका महिना पण झाला नाही, पण या शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला. या शेअरने 52 आठवड्यात 50 रुपयांवर होता. आतापर्यंत हा स्टॉक 123 रुपयांवर पोहचला.
  3. हे सुद्धा वाचा
  4. HUDCO – हॉऊसिंग डेव्हलपमेंटच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना एका वर्षात 96.37% रिटर्न दिला. हडकोचा शेअर 52 आठवड्यात 40.40 रुपयांच्या निच्चांकावर होता तर या शेअरचा उच्चांक 110.75 रुपये आहे.
  5. अलोक इंडस्ट्रीज – मुकेश अंबानी यांची ही कंपनी आहे. अलोक इंटस्ट्रीजचा पेनी स्टॉक बाजारात चांगली कामगिरी करत आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 42.99% रिटर्न दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 10 रुपये तर आतापर्यंतचा उच्चांक 22.95 रुपयांवर आहे.
  6. SUZLON – सुजलॉन या कंपनीच्या शेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 6 रुपये तर उच्चांक 44 रुपये होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.