IMPS, NPS ते FASTag; असे नियम बदलणार, फायदा की झळ बसणार

| Updated on: Jan 31, 2024 | 2:40 PM

FASTag | 1 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक नियमांत बदल होत आहे. यामध्ये IMPS, NPS आणि FASTag सह इतर अनेक बदल होत आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच या बदलांमुळे नागरिकांच्या खिशावर ताण पडू शकतो. काय होणार या नियम बदलांचा परिणाम, जाणून घ्या...

IMPS, NPS ते FASTag; असे नियम बदलणार, फायदा की झळ बसणार
Follow us on

नवी दिल्ली | 31 January 2024 : 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. या 1 तारखेपासून काही नियम पण बदलणार आहेत. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नियमात काही ना काही बदल होतो. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. यावेळी आयएमपीएस, एनपीएस, एसबीआय गृहकर्ज, फास्टटॅग केवायसी अपडेट करण्याची आज, 31 जानेवारी ही शेवटची संधी आहे. अजून काय काय झाले बदल ते जाणून घेऊयात..

IMPS मध्ये हा बदल

1 फेब्रुवारी रोजीपासून आयपीएसच्या माध्यमातून पैसे हस्तांतरीत करणे अजून सोपे झाले आहे. राष्ट्रीय देयके महामंडळ, NPCI ने याविषयाच्या नियमाची माहिती दिली आहे. आता IMPS पासून पैसा हस्तांतरीत करणे सोपे झाले आहे. बेनिफिशअरी आणि त्याचा IFSC Code याची गरज राहणार नाही. 1 फेब्रुवारीपासून पैसे ज्याला पाठवायचे त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचे नाव नोंदवून सोप्या पद्धतीने पैसे हस्तांतरीत होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

एसबीआय गृहकर्जावर सवलत

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने गृहकर्जावर सूट जाहीर केली आहे. या ऑफरनुसार गृहकर्जावर व्याजदरावर 0.65 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. सोबतच प्रक्रिया शुल्कावर पण सवलत जाहीर करण्यात आली आहे. तर इतर पण अनेक फायदे जाहीर करण्यात आले आहे. ही ऑफर 31 जानेवारी रोजी संपणार आहे.

NPS मधून पैसे काढणे

PFRDA ने 12 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार शिक्षण, लग्न, घर खरेदी आणि मेडिकल खर्च आदी खर्चासाठी एनपीएसमधून रक्कम काढू शकतात. हा नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होत आहे. त्याचा सदस्यांना मोठा फायदा होणार आहे.

FASTag ची केवायसी

तुम्ही विना केवायसी फास्टटॅग 31 जानेवारी नंतर वापरु शकणार नाही. कारण तो बॅकलिस्ट होईल अथवा तो डिएक्टीवेट करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) याविषयीचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी नसलेले फास्टटॅग 31 जानेवारीनंतर रद्द करण्यात येतील. वाहनधारकांना एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर करावा लागणार आहे. यासंदर्भात घोटाळे उघडकीस आल्यानंतर एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे.

विना केवायसी अनेक फास्टटॅग बाजारात विक्री केल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी फास्टटॅग घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टटॅगचा वापर आणि एका खास वाहनासाठी अनेक फास्टटॅगचा वापर बंद करण्यात येणार आहे. असे सर्व फास्टटॅग आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता मनस्ताप टाळण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या फास्टटॅगची केवायसी करुन घ्यावी.