AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Wale Baba : 100 कोटींच्या शेअरचे आहेत मालक, हे शेअरवाले बाबा आहेत तरी कोण!

Share Wale Baba : एका व्हायरल व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातले आहे. या बाबाच्या अवतारावरुन त्यांच्याविषयी मत बनवू नका, ते 100 कोटी रुपयांहून अधिक शेअरचे मालक आहेत, असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अर्थात या व्हिडिओची सत्यता काय याचे स्पष्टीकरण मिळत नाही.

Share Wale Baba : 100 कोटींच्या शेअरचे आहेत मालक, हे शेअरवाले बाबा आहेत तरी कोण!
| Updated on: Sep 28, 2023 | 4:52 PM
Share

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : एखाद्या करोडपतीविषयी तुम्हाला काय वाटते? म्हणजे एखादा करोडपती कसा असतो? तर त्याचे उंची कपडे, सूट-बूट, आलिशान बंगला, आलिशान कार, त्याचा थाटमाट आणि श्रीमंत झळकवणारी सर्व लक्षणं ओसंडून वाहतात नाही का? त्याच्या श्रीमंतीचा कोण हेवा अनेकांना वाटतो. पण सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडिओने या संकल्पनेला भगदाडच पाडले आहे, असे म्हणा ना. या व्हिडिओने शेअर बाजारात (Share Market) तर मोठी खळबळ उडवून दिली आहे. अनेक दिग्गज गुंतवणूकदारांच्या (Investors) तोंडचे पाणी पळाले आहे. कारण या व्हिडिओतील व्यक्तीकडे 100 कोटी रुपयांहून अधिक शेअरचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात या व्हिडिओचे सत्य काय आहे, हे काही समोर आले नाही. कोण आहेत शेअरवाले बाबा (Share Wale Baba)

या कंपन्यांचे शेअर असल्याचा दावा

या व्हिडिओला ट्विटर आताच्या एक्सवर राजीव मेहता या युझरने पोस्ट केले आहे. हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, या वृद्ध व्यक्तीकडे जवळपास 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे शेअर आहेत. त्यांच्याकडे एलअँडटी कंपनीचे 80 कोटी रुपयांचे शेअर आहेत. अल्ट्राटेक कंपनीचे 21 कोटींचे शेअर आहेत. कर्नाटक बँकेचे 1 कोटी रुपयांचे शेअर आहेत. एकूण या व्यक्तीकडे 102 कोटींचे शेअर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

असे झाले करोडपती

अर्थात अनेकांनी या व्हिडिओतील दाव्यावर आक्षेप घेतला आहे. हे शक्य नसल्याचे सांगत अनेक युझर्सनी थेट गणितच मांडले आहे. या व्हिडिओनुसार या वयस्कर बाबांकडे एलअंडटीचे 27 हजार शेअर असल्याचा दावा आहे. त्याचे मूल्य जवळपास 8 कोटी रुपये आहे. अल्ट्राटेक सिमेंट कपंनीच्या शेअरचे मूल्य जवळपास 3.2 कोटी रुपये तर कर्नाटक बँकेच्या शेअरचे मूल्य जवळपास 10 लाख रुपये आहे. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण शेअरचे मूल्य 11 कोटी रुपये होते.

लाभांशावरच मोठी कमाई

जर व्हिडिओतील दावे खरे मानले तरी या व्यक्तीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर शेअरवाले बाबा अशी ओळख मिळाली आहे. एका युझरने तर लाभांशामुळे बाबांना किती कमाई झाली, याचा पण हिशेब मांडला. या बाबांना आरामात लाभांशामुळे लाखो रुपये मिळाले असतील, असा त्यांचा दावा आहे.

ही गोष्ट गाठीशी बांधा

या व्हिडिओच्या सत्यतेविषयी काहीच समोर आलेले नाही. या व्हिडिओविषयी अनेक युझर्स संभ्रमात आहेत.  TV9 मराठी पण या व्हिडिओची पुष्टी करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर बाजार म्हणजे लॉटरी सेंटर नाही. ज्याचा अभ्यास नाही, ज्याने तज्ज्ञाचा सल्ला घेतलेला नाही, अशा हवशा, नवशा आणि गवशांसाठी शेअर बाजारात नुकसान ठरलेले आहे. ही गुंतवणूक जोखिमेची असते. त्यामुळे डोळे झाकून गुंतवणूक करणे तुम्हाला आर्थिक नुकसानदायक ठरु शकते.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.