Today’s petrol, diesel rates: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला नसून पेट्रोल, डिझेचे दर स्थिर आहेत.

Today's petrol, diesel rates: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल, डिझेलचे दरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 7:35 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मात्र नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol & Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मागच्या आठवड्यात शनिवारी केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये (Excise Duty) कपात केल्याने पेट्रोलचा दर प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचा दर प्रति लिटर मागे सात रुपयांनी स्वस्त झाला होता. केंद्र सरकारनंतर महाराष्ट्र, केरळ, ओडीशा या राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये (Value-Added Tax) कपात केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पहाता भविष्यात पेट्रोल, डिझेलची दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 111.02 आणि 95.54 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 असून, डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये एवढा आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.7 तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 इतका आहे.

हे सुद्धा वाचा

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

सलग सात दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.