AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसच मोदींचे वारसदार, थेट उपपंतप्रधान… तीन महिन्यात मोठ्या घडामोडी; बड्या नेत्याचा दावा

इंदिरा गांधी आंदोलनाला परवनगी देत होत्या. आणीबाणीत आणि इतर काळातही इंदिरा गांधींनी आंदोलनाला परवानगी दिल्या आहेत. लाठी असो की गोळी असो आम्हाला रोखू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल जंतरमंतरवर आणि मुंबईत. लोक तुरुंगात गेले. लोकांनी पोलिसांसोबत संघर्ष केला आहे. लाठी काय गोष्ट आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीसच मोदींचे वारसदार, थेट उपपंतप्रधान... तीन महिन्यात मोठ्या घडामोडी; बड्या नेत्याचा दावा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 11:09 AM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार आहेत. त्यांना आधी उपपंतप्रधान बनवावं, अशी संघाची भूमिका आहे. संघात तशी चर्चा सुरू आहे. येत्या तीन महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. राजकीय भूगर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

या क्षणी भूगर्भातील हालचाली सुरू आहेत. भूकंप होण्याआधी छोटेमोठे धक्के जाणवतात. खाटा हलतात, पंखे हलतात. देशात आणि भाजपच्या अंतर्गत सध्या तेच सुरू झालं आहेत. जानेवारीत देशाच्या राजकारणात फार मोठे फेरबदल होताना दिसतील. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत फार मोठे भूकंपाचे धक्के दिसतील, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

लोक पळवून पळवून मारतील

फडणवीस यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती व्हावी, असं संघाचं म्हणणं आहे. कुणी काहीही म्हणू द्या. फडणवीस यांनाच उपपंतप्रधान म्हणून जागा मिळावी, तेच मोदींचे वारसदार असावे, असं संघ राष्ट्रीय स्तरावर म्हणत आहे. संघात तशी चर्चा आहे. असं घडत असेल तर फडणवीस यांना आवाहन आहे, त्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करावी. मोदी लोकशाही विरोधी आहेत, म्हणून त्यांना जावं लागत आहे. हा धडा फडणवीस यांनी जाण्याआधी घेतला पाहिजे. मोदींविरोधात लोकांनी बंड का पुकारलं आहे. तुम्ही कितीही मोठे असाल, उद्योगपतींचा पाठिंबा असेल तरीही लोक रस्त्यावर येऊन पळून पळून मारतील. ती वेळ येऊ नये म्हणून अनेक काही लोकं सरकारपासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.

उद्या दिसेल काय आहे ते…

यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या मोर्चावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन ठाकरे बंधू यांच्या पुढाकाराने मोर्चा पुढे जात आहे. सर्वच पक्षाला आम्ही आमंत्रण दिलं आहे. शेकापचे राजेंद्र कोरडे आले होते, त्यांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली आहे. शरद पवारांशी चर्चा झाली आहे. काँग्रेसशी चर्चा झाली आहे. सर्व डावे पक्ष, शिवसेना, मनसे आदी महाविकास आघाडी म्हणून एकत्र येत आहोत. त्या ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एक प्रचंड मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी आहे. तयारी झाली आहे. उद्या दिसेलच तयारी काय आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

मोदींना जावंच लागेल

सीजेपीचं आंदोलन सर्वच चॅनलने आणि वृत्तपत्रांनी कव्हर केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्याला तुम्ही गोदी मीडिया म्हणता ते जेव्हा सरकार विरोधातील आंदोलनाला वृत्तपत्रात आणि चॅनलमध्ये जागा देतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, देशातील हवा झपाट्याने बदलत आहे. वातावरण बदलत आहे. मी इथेच सांगितलं होतं, 17 सप्टेंबर नंतर काय होतंय ते पाहा. त्यानंतरच देशातील राजकीय हवा बदलत आहे. मोदी देशाच्या पंतप्रधानपदी राहत नाही. तरीही मोदी राहिले तर सर्व सरकार बदलावं लागेल. मोदी आणि शाहांची अवस्था त्यांच्या पक्षात आणि संघात वाईट आहे. संघाला त्यांचं ओझं झालं आहे. लोकं मोदी आणि शाहांचा द्वेष करत आहेत. मोदींना जावं लागेल. त्या आधी ज्ञानेशकुमार यांना जावं लागेल, असंही ते म्हणाले.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर