
Top 10 Countries To Buy Cheapest Gold In 2025 : सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोने हा बहुमुल्य धातू असल्याने लोक गुंतवणूकीसाठी सोन्यालाच प्राधान्य घेतात. लोक शृंगार आणि सांस्कृतिक परंपरा म्हणूनही सोन्याची खरेदी करत असतात. परंतू कर रचना, आयात शुल्क आणि बाजारातील मागणी याआधारे सोन्याची किंमत प्रत्येक देशात भिन्न – भिन्न असते. काही देशात सोन्याची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे देश सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र बनले आहेत.
ऑक्टोबरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत भारतात १.२३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास गेलेली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर २४ कॅरेट सोन्याचे ७८,०४० रुपयात विकले जात आहे. आणि तेव्हापासून सोन्याचे दर चढेच आहेत. याशिवाय येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची आशा आहे. कारण भारतात आता दिवाळी आणि नाताळ असे एकामागोमाग सण येत आहेत. त्यामुळे सोन्याची चमक कायमच राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
परंतू तुम्हाला माहिती आहे का काही देश असे आहेत जेथे भारताच्या तुलनेत सोने स्वस्त विकले जात आहे. आयात शुल्क आणि कर कमी असल्याने काही देशात सोने भारताहून स्वस्त मिळत आहेत. उदाहरणार्थ दुबई, हाँगहाँग आणि तुर्की सारख्या ठिकाणांवर सोने सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्धी किंमतीवर विकले जाते. कमी भावात सोने खरेदी करण्यासाठी या देशात लोक जात असतात.
येथे आपण पाहणार आहोत की कोणत्या देशात सोन्याच्या खरेदी सर्वात चांगली बचत होते. त्यामुळे तुमच्या पैशाची बचत करण्यास मदत मिळणार आहे. साल २०२५ च्या आकडेवारीनुसार सोन्याची खरेदी करण्यासाठी टॉप-10 देशांची आपण माहिती घेणार आहोत.
| भारत | 1,23,035 रुपये (24K) | 111850 रुपये (22K) | 91520 रुपये (18K) |
|---|---|---|---|
| हाँगकाँग | 1,13,140 रुपये (24K) | 103620 रुपये (22K) | 84820 रुपये (18K) |
| तुर्की | 1,13,040 रुपये (24K) | 103550 रुपये (22K) | 84800 रुपये (18K) |
| कुवैत | 1,13,570 रुपये (24K) | 104240 रुपये (22K) | 85220 रुपये (18K) |
| दुबई | 1,14,740 रुपये (24K) | 106280 रुपये (22K) | 87200 रुपये (18K) |
| बहारीन | 1,14,420 रुपये (24K) | 107120 रुपये (22K) | 87580 रुपये (18K) |
| अमेरिका | 1,15,360 रुपये (24K) | 109148 रुपये (22K) | 88750 रुपये (18K) |
| सिंगापुर | 1,18,880 रुपये (24K) | 107860 रुपये (22K) | 87930 रुपये (18K) |
| ऑस्ट्रेलिया | 1,21,870 रुपये (24K) | 108980 रुपये (22K) | 89060 रुपये (18K) |
| रशिया | 1,03,910 रुपये (24K) | 113370 रुपये (22K) | 92760 रुपये (18K) |
| इंडोनेशिया | 1,12,990 रुपये (24K) | 103500 रुपये (22K) | 84880 रुपये (18K) |
स्रोत: गोल्ड रिटर्न्स, Goldprice.org