Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

| Updated on: Mar 04, 2022 | 11:47 AM

गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine crisis) सुरू आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. नवव्या दिवशी रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेने आंतरराष्ट्रीय स्थरावर खळबळ माजली असून, बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे.

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine crisis) सुरू आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. नवव्या दिवशी रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणूऊर्ज प्रकल्पावर हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेने आंतरराष्ट्रीय स्थरावर खळबळ माजली असून, बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Federal reserves) देखील चालू महिन्यात व्याज दर वाढवण्याची घोषणा केली आहे. या दोन घटनांचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर पहायला मिळत आहे. आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात मोठी पडझड झाली. सेंन्सेक्स (Sensex today) तब्बल 828 अकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये देखील 235 अकांची घसरण झाली. सध्या सेंन्सक्स 828 अंकाच्या घसरणीसह 54274 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 235 अकांच्या घसरणीसह 16262 वर पोहचला आहे. गुरुवारी शेअर बाजारात थोडीशी तेजी दिसून आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका बसला आहे. सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील काही दिवसांपासून तेजी पहायला मिळत आहे.

सोने महागले

सोन्याचे दर 14 महिन्यातील सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 241 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52011 रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात देखील तेजी दिसत असून, आज चांदीच्या दरात 316 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचे दर 68220 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावामध्ये तीव्र चढ उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कच्चे तेल 185 डॉलरवर जाण्याची शक्यता

युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. तीन मार्च म्हणजे गुरुवारी कच्च्या तेलाच्या भावाने मागील आठ महिन्याचे रेकॉर्ड तोडले. कच्च्या तेलाचे दर आठ महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. गुरुवारी कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल 118 डॉलरवर पोहोचले होते. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा भावात किंचित घट झाली असून, आज कच्च्या तेलाचे दर 111 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते जर युद्ध आणखी काही दिवस असेच सुरू राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल 185 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी-मंदीचा खेळ, आज पुन्हा दर घसरले; जाणून घ्या इंधनाचे नवे दर

रशिया – युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!

युद्धादरम्यान ग्राहकांना दिलासा; देशी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, पाम तेलाच्या दरात तेजी कायम