AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2025: आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंत आयकर नाही

Union Budget 2025 Nirmala Sitharaman: पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही.

Union Budget 2025: आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंत आयकर नाही
nirmala sitharaman
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Edited By: | Updated on: Feb 01, 2025 | 4:57 PM
Share

Union Budget 2025 Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा, 1961 ची जागा घेईल. आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.

किती बदलला टॅक्स

  • 0 ते 12 लाखांपर्यंत – काहीच कर नाही
  • 12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर लागणार
  • 16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के आयकर लागणार
  • 20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के आयकर लागणार
  • 24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर लागणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली आहे. त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात येत आहे. टीडीएस-टीसीएस कमी होणार आहे.

2020 च्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली, तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितले की, आयकर दात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण आता देशातील 65 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. म्हणजेच प्रत्येक 3 पैकी 2 लोक नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर भरत आहेत. गेल्या एका वर्षात या डेटामध्ये बरेच बदल झाले आहेत.

बदलानंतर नवीन कर व्यवस्था अशी होती

  • ₹0-₹3 लाख: शून्य
  • ₹3-₹7 लाख: 5%
  • ₹7-₹10 लाख: 10%
  • ₹10-₹12 लाख: 15%
  • ₹12-₹15 लाख: 20%
  • ₹15 लाखाच्या वर: 30%

जुनी कर व्यवस्था अशी

  • 0 ते 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर: 0%
  • 2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर: 5%
  • 5 लाख ते 10 लाख रुपये उत्पन्न: 20%
  • 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर: 30%

Income Tax Calculator Tool

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...