AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026 : बजेटची ती सोपी गोष्ट; बजेटमधील या 10 शब्दांचा अर्थ काय, एका क्लिकवर समजून घ्या

Union Budget 2026 Key Terms : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज रविरवारी 1 फेब्रुवारी रोजी बजेटचं वाचन करायला सुरूवात केली आहे. सध्या मोठी निवडणूक नसताना मोदी सरकार सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

Budget 2026 : बजेटची ती सोपी गोष्ट; बजेटमधील या 10 शब्दांचा अर्थ काय, एका क्लिकवर समजून घ्या
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 01, 2026 | 11:16 AM
Share

Union Budget 2026:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्पाचं 2026 संसदेत आज 1 फेब्रुवारी रोजी वाचण सुरू केलं आहे. अर्थसंकल्प, बजेट आणि त्यातील काही किचकट आणि आकडेवारीमुळे अनेकांना बजेट कळत नाही. अथवा त्यांना काही शब्दांचा अर्थ लागत नाही. अशावेळी बजेटची ही शब्दावली तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जाणून घ्या बजेट सोपी करणाऱ्या या शब्दांचा अर्थ (Budget Vocabulary)

या शब्दांचा घ्या बजेटपूर्वी अर्थ समजून

1- अर्थसंकल्प अंदाज

अर्थसंकल्पात मंत्रालय, विविध विभाग, प्रदेश, योजना यासाठी जो निधी दिल्या जातो, त्याचा अंदाज बांधण्यात येतो. त्यात निधीचा वापर किती आणि कुठे करणार याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

2- वार्षिक आर्थिक विवरण (AF)

वार्षिक आर्थिक विवरण (Annual Financial Statement) हा एक दस्तावेज आहे. आर्थिक वर्षादरम्यान सरकारचे उत्पन्न, महसूल आणि खर्च यावर तो प्रकाश टाकतो.

3-प्रत्यक्ष कर (Direct Taxes)

प्रत्यक्ष कराचे उत्पन्न, जे थेट करदात्यांकडून मिळते. त्यात आयकर आणि कॉर्पोरेट कराचा समावेश आहे.

4- आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey)

आर्थिक सर्वेक्षण बजट सत्रादरम्यान सादर करण्यात येते. आगामी आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची गती कशी असेल, तिची कामगिरी कशी असेल याची माहिती या बजेटमध्ये कळते.

5- वित्त बिल (Finance bill )

वित्त बिल हा एक दस्तावेज आहे. हा दस्तावेज नवीन कर लावणे, नवीन करात बदल करणे अथवा कराची व्यवस्था कायम ठेवणे याची माहिती देतो.

6- वित्तीय तूट (Fiscal Deficit)

वित्तीय तूट गेल्या आर्थिक वर्षासाठी (Financial Year) सरकारच्या एकूण खर्च आणि महसूल यामधील फरकाची रक्कम आहे. त्यासाठी इतर अनेक उपाय योजना करण्यात येतात. तर वेळप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज सुद्धा घेण्यात येते. एकूण देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी यावर ते अवलंबून असते.

7- अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes)

हे कर अप्रत्यक्षरित्या करदात्यांकडून घेण्यात येतात. यामध्ये जीएसटी, व्हॅट, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, सेवा कर वा इतर करांचा यामध्ये समावेश होतो.

8- महागाई (Inflation)

देशातंर्गत विविध वस्तू, सेवा आणि रोजच्या वापरातील पदार्थ यांच्या किंमतीत झालेली वाढ याचा महागाईवर परिणाम दिसून येतो. महागाई जितकी जास्त असेल, तितका ग्राहकांचा खर्च वाढतो.

9- नवीन कर प्रणाली (New Tax Regime)

2022 मध्ये नवीन कर प्रणालीत सवलतीच्या दरात सात टॅक्स स्लॅब (Tax Slab) आहे. आर्थिक वर्षात 2023-24 दरम्यान, नवीन कर प्रणाली डिफॉल्ट झाली आहे. तर जुनी कर प्रणाली ही एक पर्यायी व्यवस्था आहे.

10- जुनी कर व्यवस्था (Old Tax Regime)

जुनी कर व्यवस्थेत चार कर व्यवस्था आहे. यामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30% पेक्षा अधिक कर आकारला जातो.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!