देशाचं बजेट तुमच्या मोबाईलवर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

Interim Budget 2019 : मोदी सरकार (Modi Government) कार्यकाळातील शेवटचं बजेट (Budget) 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. निवडणुकीपूर्वीचं हे बजेट अंतरिम बजेट (Interim Budget) आहे. निवडणुकानंतर जे सरकार सत्तेत येईल, ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल (Piyush Goyal) हे देशाचा अर्थसंकल्प […]

देशाचं बजेट तुमच्या मोबाईलवर!
Follow us

Interim Budget 2019 : मोदी सरकार (Modi Government) कार्यकाळातील शेवटचं बजेट (Budget) 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. निवडणुकीपूर्वीचं हे बजेट अंतरिम बजेट (Interim Budget) आहे. निवडणुकानंतर जे सरकार सत्तेत येईल, ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल (Piyush Goyal) हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात मोदी सरकार भरघोस घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे टॅक्स स्लॅब अर्थात कररचना. मोदी सरकार सध्याची अडीच लाखाची करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय शेती, महिला, युवकांसाठीही भरघोस तरतुदी करण्याची शक्यता आहे.

देशाचं बजेट साध्या, सोप्या भाषेत टीव्ही 9 मराठीवर तुम्ही पाहू शकाल. तुमच्या मोबाईलवर बजेटचे अपडेट मिळू शकतील. त्यासाठी तुम्हाला www.tv9marathi.com वर लॉग ऑन करावं लागेल.

याशिवाय तुम्हाला टीव्ही 9 च्या फेसबुक आणि ट्विटरवरही बजेटचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.

अर्थसंकल्प 2019 (Interim Budget 2019)

अर्थमंत्री पियुष गोयल 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटबाबत मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सर्वसामान्य अर्थसंकल्प 2019 (Budget 2019-20) हे निवडणुकीपूर्वी सादर होत असल्याने त्यामध्ये वर्षभराचा संपूर्ण आढावा नसेल. निवडणूक वर्षात सामान्यत: नवं सरकार स्थापन होईपर्यंत चार महिन्यांसाठी प्रशासनिक कार्य आणि विकासकामांवरील खर्चाचा तपशील अंतरिम बजेटमध्ये सादर केला जातो. मात्र विद्यमान भाजप सरकार ही परंपरा तोडून पूर्ण बजेट सादर करण्याची शक्यता होती. पण त्यावर अर्थमंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन त्यावर पडदा टाकला आहे.

अर्थसंकल्प 2019 कधी सुरु होईल?

केंद्र सरकार संसदेत 1 फेब्रुवारीला बजेट सादर करेल. अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाच भार पियुष गोयल यांच्याकडे आहे, त्यामुळे तेच सकाळी 11 वा. अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सर्वात आधी सरकार 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत जमा-खर्चाची माहिती देईल. त्यानंतर अर्थमंत्री आपलं भाषण देतील. 1999 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वा सादर करण्याची प्रथा होती, मात्र 1999 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.

बजेट कसं सादर केलं जाईल?

सर्वात आधी संसद भवनात अर्थसंकल्पासंदर्भात कागदपत्र आणली जातील. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. या बैठकीत अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय होतील. त्यानंतर अर्थमंत्री बजेट सादर करतील.

 अर्थसंकल्प 2019 Live (Budget Live)

अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. टीव्हीसह तुम्ही वेबसाईट tv9marathi.com वर बजेटची बित्तमबातमी पाहू शकाल. शिवाय तुमच्या मोबाईलवर लाईव्ह टीव्हीद्वारे tv9marathi.com/live-tv बजेट लाईव्ह पाहू शकाल.

याशिवाय तुम्हाला फेसबुकवर www.facebook.com/Tv9Marathi/ आणि ट्विटरवरही twitter.com/TV9Marathi बजेट लाईव्ह पाहता येईल. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीचं न्यूज चॅनेल तुम्ही यूट्यूबवर 24 तास लाईव्ह पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=MnU5sDJLAz8

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI