AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : या शहरात महागले, इथे स्वस्त, एक लिटर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा स्वस्त पेट्रोलचा फॉर्म्युला कधी फायद्याचा ठरेल, हे निश्चित नाही. पण सध्या फायद्यात असलेल्या तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करणे आवश्यक आहे. काय आहे आजचा इंधनाचा भाव.

Petrol Diesel Rate Today : या शहरात महागले, इथे स्वस्त, एक लिटर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
आजचा भाव काय
| Updated on: Jul 06, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने नवनवीन इंधन प्रयोगाची चर्चा करतात. त्यांनी हायड्रोजन कार वापरायला सुरुवात केली. इथेनॉल आणि विद्युत वाहनं हा त्यांचा आवडता भाग, त्यादृष्टीनं देशात प्रयोग होत आहे. पण सध्या फायद्यात असलेल्या तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price) कमी केला तर जनतेला तोच मोठा दिलासा ठरेल. इंधनाचे स्वस्त आणि शाश्वत पर्याय शोधणे आवश्यकच आहे. पण देशात एका वर्षांपासून महागडे इंधनाची खरेदी करावी लागत आहे. त्याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला नाही. अथवा केंद्र सरकार त्यासाठी काही प्रयत्न करताना पण दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार, याच चिंतेत सर्वसामान्य, चाकरमानी असतात. आज काही शहरात इंधन काही पैशांनी स्वस्त झाले तर काही ठिकाणी महागले. जाणून घ्या आजचा भाव.

कच्चा तेलात किंचित वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात आज किंचित वाढ झाली. 6 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.63 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 71.90 डॉलर प्रति बॅरल झाला. गेल्यावर्षीपेक्षा हे भाव कमी आहेत.

गेल्यावर्षी भावाचा रेकॉर्ड रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर मार्च 2022 मध्ये कच्चा तेलाचे भाव भडकले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

सकाळीच भाव अपडेट भारतीय तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा भाव अपडेट केले आहे. सकाळी 6 वाजता इंधनाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. हे भाव पुढील 15 दिवसांसाठी कायम राहत असत.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108.07 पेट्रोल आणि डिझेल 96.02 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.83 तर डिझेल 94.30 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.33 तर डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.64 आणि डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.81 आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.75 रुपये तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?