UPI 3.0 : आता टीव्ही, फ्रिज आणि कारमधून करा UPI पेमेंट; अपडेट ऐकून आश्चर्याचा धक्का

UPI Digital Payment : UPI मध्ये मोठी अपडेट समोर येत आहे. देशात आता UPI 3.0 चे वारे वाहत आहे. NPCI युझर्ससाठी भन्नाट सेवा आणण्याच्या तयारीत आहे. आता स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्ट डिव्हाईसमधूनही पेमेंट करता येईल. काय आहे हे फीचर?

UPI 3.0 : आता टीव्ही, फ्रिज आणि कारमधून करा UPI पेमेंट; अपडेट ऐकून आश्चर्याचा धक्का
| Updated on: Aug 22, 2025 | 4:09 PM

जर तुम्ही UPI चा वापर करत असाल तर ही हटके बातमी तुमच्यासाठीच आहे. युपीआय आता कात टाकणार आहे. देशात लवकरच UPI 3.0 ची सेवा सुरू होत आहे. राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI ) महत्त्वपूर्ण बदल केले आहे. NPCI युझर्ससाठी भन्नाट सेवा आणण्याच्या तयारीत आहे. आता स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्ट डिव्हाईसमधूनही पेमेंट करता येईल. काय आहे हे फीचर? कशी होणार सेवा अद्ययावत, कसा होईल तुम्हाला त्याचा फायदा?

UPI 3.0 मध्ये काय काय?

NPCI कडून UPI 3.0 ची लवकरच सुरूवात होऊ शकते. या अपग्रेडमध्ये एक खास गोष्ट आहे. आता IoT अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर होईल. युपीआयसाठी हे फीचर उपयोगात येणार आहे. या नवीन तंत्रज्ञाना आधारे तुम्ही दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या गॅझेटचा वापर करू शकता. यामध्ये स्मार्ट वॉच, रिंग, टीव्ही, कार अथवा फ्रीज यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे की, UPI 3.0 आल्यानंतर तुमच्या घरातील स्मार्ट डिव्हाईसच्या माध्यमातून पेमेंट करता येईल. त्यासाठी फोनवर बिलकूल अवलंबून राहावे लागणार नाही.

UPI AutoPay- UPI Circle चे फीचर

UPI 3.0 सोबत तुम्हाला युपीआय ऑटो पे आणि युपीआय सर्कल सारखे फीचर पण मिळतील. त्यामुळे कर्ता पुरुष घरी नसला तरी, घरातील स्मार्ट डिव्हाईसच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांना पेमेंट करता येईल. घरातील टीव्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन, कार आणि स्मार्ट वॉच या सारखे स्मार्ट डिव्हाईस ही कमी भरून काढतील. हे एक फ्युचरिस्टिक फीचर्स तुमच्या उपयोगी पडेल.

पण सेवा मिळणार कधी?

UPI 3.0 ची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. पण प्राप्त अहवालानुसार, यंदा होणाऱ्या Global Fintech Fest 2025 त्याची घोषणा होऊ शकते. हे फेस्टीव्हल ऑक्टोबर 2025 मध्ये होऊ शकते. विशेष म्हणजे घरातील या स्मार्ट डिव्हाईसमधून किती पेमेंट करायचे याची एक मर्यादा ठरवता येईल. त्यामुळे कमवत्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. पैशांचा योग्य आणि हवा तितकाच वापर करता येईल.