
मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना शेअर बाजारात नवीन विक्रम झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७२ हजारांवर पोहचला आहे. त्याचवेळी निफ्टीनेही २१ हजारांचा टप्पा पार केला आहे. शेअर बाजारातील अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर वर्षभरातील उच्चांकी पातळीवर आहे. परंतु अनिल अग्रवाल यांच्या वेदांत कंपनीचे शेअर घसरले आहे. मेटर आणि मायनिंग सेक्टरमधील या दिग्गज कंपनीचे शेअर वर्षभरात तब्बल २२ टक्के घसरले आहे. वेदांताचे शेअर घसरणीमागे तीन D असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.
वेंदातासंदर्भातील तीन D म्हणजे वेदांताच्या पेरेंट कंपनीवर असलेले कर्ज म्हणजे डेट (Debt), दुसरा D म्हणजे घसरणारा डिव्हिडंट (dividend) आणि तिसरा D म्हणजे डिमर्जर (demerger) आहे. वेदांताच्या शेअरमध्ये घसरणीचे सलग दुसरे वर्ष आहे. त्यापूर्वी २०२१ मध्ये शेअरची किंमत दुप्पट झाली होती. वेदांताची पेरेंट कंपनी वेदांता रिसोर्सेजला सन २०२४-२५ मध्ये दोन अब्ज डॉलरचे बॉन्ड्सचे रिपेमेंट करायचे आहे. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजकडून दिलेल्या माहितीनुसार कंपनीला पुढील आर्थिक वर्षात 3.6 अब्ज डॉलरचे लोन रिपेमेंट करावे लागणार आहे.
कंपनीने या वर्षात एका रुपयाच्या शेअर एक रुपये अंतरिम डिव्हडंट जाहीर केला आहे. मागील तीन वर्षांत कंपनीने दिलेला हा सर्वात कमी डिव्हिडंट आहे. वेदांताची उपकंपनी हिंदुस्तान जिंकने मागील पाच वर्षांत सर्वात कमी डिविडेंट पेआउट दिला आहे. सप्टेंबर महिन्यात वेदांता ग्रुपची सहा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी म्हणजे डिमर्जर करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. शेअर धारक या निर्णयामुळे नाराज दिसून येत आहे. डिमर्जर प्रक्रियेमुळे ऑक्टोंबरमध्ये एक बेस मेटल युनिट सुरु करण्यात आला आहे. दरम्यान वेदांता शेअर संदर्भात 14 विश्लेषकांनी आपले मत दिले आहे. त्यातील 7 जणांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तर 4 विश्लेषकांनी ‘होल्ड’ चा सल्ला दिला आहे. 3 विश्लेषकांनी ‘सेल’ करण्याचे म्हटले आहे.