AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या गावात एक डास मारण्यासाठी मिळतात 400 रुपये, श्रीमंत व्हायचंय? मग या गावात एकदा याच

अनेक गाव वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध असतात, महाराष्ट्रामध्ये देखील असं एक गाव आहे, ज्या गावात एक डास जरी मारला तर तब्बल 400 रुपये मिळतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रातील या गावात एक डास मारण्यासाठी मिळतात 400 रुपये, श्रीमंत व्हायचंय? मग या गावात एकदा याच
mosquitoImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 3:44 PM
Share

भारतामध्ये अशी अनेक गावं आहेत, जी वेगवेगळ्या कारणांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. या गावांना भेटी देण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात. यातील काही गावं ही त्या गावांमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा परंपरांमुळे चर्चेत असतात. तर काही गावं ही त्या गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या काही विशिष्ट निर्णयांमुळे चर्चेचं केंद्र बनतात. भारतात अशी काही गावं आहेत, ज्या गावांमध्ये प्राणी पाळावेत तसे साप पाळले जातात, या गावातील अगदी लहान मुल देखील सापांना घाबरत नाहीत त्यामुळे ही गाव प्रसिद्ध आहेत. तर केरळमधील एक गाव जुळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अशी गावं लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, ज्या गावात एक डास मारण्यासाठी 400 रुपये दिले जातात. हे ऐकताच हे गाव नेमकं कुठे आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्याही मनात निर्माण झालीच असेल, चला तर मग या गावाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

भारतामध्ये विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध गावं आहेत, मात्र असं एक गाव जे डास मारण्यासाठी पैसे देतं हे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलं नसेल. मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे डास मारण्यासाठी पैसे दिले जातात. या गावाचं नाव आहे, हिवरे बाजार, हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात तुम्हाला एकही कुटुंब गरीब सापडणार नाही, राज्यात सर्वाधिक करोडपती लोक या गावात राहतात. या गावात सध्या स्थितीमध्ये एकूण 305 कुटुंब राहतात. विशेष म्हणजे यातील जवळपास 80 टक्के कुटुंब हे करोडपती आहेत. या गावात भेट देताच कुठलाही पर्यटक या गावाच्या प्रेमात पडतो असं हे गाव आहे. वीजेपासून ते पाण्यापर्यंत अशा सर्व गोष्टींचं काटेकोर व्यवस्थापन या गावात तुम्हाला पाहायला मिळेल.

80 ते 90 च्या दशकात या गावात भयंकर दुष्काळ पडला होता, ग्रामस्थांना खायला अन्न नव्हतं. या काळात अनेकांनी हे गाव सोडलं. मात्र त्यानंतर मोठा कायपालट झाला. गावात दुष्काळानंतर ज्वाइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमेटी स्थापन करण्यात आली. या निर्णयानंतर गावाची परिस्थिती हळुहळु बदलत गेली. गावाला सुधारण्यासाठी येथील ग्रामस्थांनी प्रचंड कष्ट घेतले. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात एकही डास नाही, ग्रामस्थांचं असं चॅलेंज आहे की, कोणीही इथे एक जरी डास पकडला तर त्याला प्रत्येक डासासाठी 400 रुपये दिले जातील.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप