AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँच झाला १५ हजाराचा स्मार्टफोन, कमी किंमतीत जबराट फिचर्स

ज्यांना १५ हजार रुपयांत चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी नवा स्मार्टफोन बाजारात दाखल होत असून हा फोन मीडिया टेक डायमेंसिटी प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्लेसह बाजारात उपलब्ध होणार आहे. या फोनची आणखी काय फिचर्स आहेत हे पाहूयात....

लाँच झाला १५ हजाराचा स्मार्टफोन, कमी किंमतीत जबराट फिचर्स
lava
| Updated on: Mar 13, 2026 | 4:01 PM
Share

जर तुम्ही १५ हजार बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छीत असाल तर असा लोकांसाठी Lava ने एक नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Bold 2 5G ची खास बाब म्हणजे या फोनला मीडिया टेक डायमेंसिटी प्रोसेसर सह बाजारात आणण्यात आले असून त्याचा एंटूटू स्कोअर ५ लाखाहून जास्त आहे. एवढेच नव्हे तर या फोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत ६ जीबी व्हर्च्युअल रॅमचा देखील सपोर्ट मिळत आहे.

या स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. हा फोन तुम्हाला ब्लोट वेअर एक्सपिरियन्सची ऑफर देत आहे. लाव्हा बँडच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत किती आहे ? या फोनची विक्री कधी पासून सुरु होणार आहे ? या फोनमध्ये या शिवाय आणखी कोण-कोणते फिचर्स आहेत. चला या संदर्भात माहिती घेऊयात…

Lava Bold 2 5G Price in India

या लेटेस्ट लाव्हा मोबाईल फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १२,९९९ रुपयांत लाँच केले आहे. फोनच्या या किंमतीत बँक ऑफर्सचा देखील समावेश आहे. म्हणजे बँक ऑफर्सचा बेनिफिट मिळाल्यानंतर हा फोन तुम्हाला या किंमतीत मिळणार आहे.

हा स्मार्टफोन १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. हा फोन जर तुम्हाला ऑनलाईन विकत घ्यायचा असेल तर ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरुन खरेदी करु शकता. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि फेदर व्हाईट रंगात उपलब्ध होणार आहे. या किंमतीत लावाच्या या फोनला MOTOROLA g57 power 5G, REDMI Note 14 SE 5G, POCO M7 Plus 5G, Samsung Galaxy F06 5G आणि vivo T4x 5G शी स्पर्धा आहे.

Lava Bold 2 5G Specifications

डिस्प्ले: या लेटेस्ट फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळेल.

चिपसेट: लाव्हाच्या या हँडसेटमध्ये २.६ गिगाहर्ट्झसह मीडियाटेक डायमेंसिटी ७०६० प्रोसेसर मिळणार आहे.

कॅमेरा सेटअप : या मोबाईल फोनच्या मागच्या बाजूला ५० मेगापिक्सेल एआय रिअर सोनी कॅमेरा सेंसर मिळणार आहे.

बॅटरी क्षमता : ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी या सोबत देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: लाव्हा ब्रँडचा हा लेटेस्ट एंड्रॉईड १५ ओएसवर काम करतो.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?