Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता?, मग ‘ही’ रणनिती ठरेल फायदेशीर; मिळेल अधिक नफा कमावण्याची संधी

| Updated on: Aug 28, 2022 | 2:20 AM

शेअर्समध्ये (Share) गुंतवणूक (investment) म्हणजे आतबट्टयाचा व्यवहार असा अनेक जणांचा गैरसमज असतो. यामुळे बरेच गुंतवणूकदार (investors) शेअर बाजारापासून चार हात लांब राहतात. परंतु पैसे काळजीपूर्वक गुंतवल्यास तुम्ही देखील शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवू शकतात.

Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता?, मग ही रणनिती ठरेल फायदेशीर; मिळेल अधिक नफा कमावण्याची संधी
Follow us on

शेअर्समध्ये (Share) गुंतवणूक (investment) म्हणजे आतबट्टयाचा व्यवहार असा अनेक जणांचा गैरसमज असतो. यामुळे बरेच गुंतवणूकदार (investors) शेअर बाजारापासून चार हात लांब राहतात. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार सहसा भावनात्मक निर्णय घेतात. त्यामुळे गुंतवणूकदाराने पॅनिक न होता मध्यम पर्याय निवडावेत म्हणजेच अति उत्साहात किंवा जास्त घाबरू न जाता मध्यम मार्ग निवडावा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीमेपासून वाचण्यासाठी काही रणनितींचा वापर केल्यास नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. सर्वात आधी जोखीम ओळखा. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे जास्तीत जास्त किती जोखीम घेऊ शकता हे स्पष्ट होतं. नुकसान कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जोखीमेचं व्यवस्थापन करा दुसरं म्हणजे तुम्ही जर स्वतः निधीचं व्यवस्थापन करत असाल तर एका ठराविक काळानंतर समीक्षा करा. बाजारातील चढ उतारात गुंतवणुकीतील बंदलांवर लक्ष ठेवा. जर तुमच्याकडे फंड व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसेल तर इंडेक्स फंड किंवा ETF सारख्या इतर पॅसिव्ह फंडात गुंतवणूक करा.

गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ

गेल्या दोन वर्षात शेअर बाजारातील लहान गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये. बाजारात तेजी असताना सर्वांनीच पैसा कमावला. त्यामुळे अनेकांनी आपल्या गुंतवणुकीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवलाय. जोखमीपासून वाचण्यासाठी लहान गुंतवणुकदारांनी पोर्टफोलियोमध्ये विविधता आणलेली नाही. गुंतवणूकदाराने आपले लक्ष्य आणि आर्थिक बाजू समजून घेऊन अॅसेट एलोकेशन करावे. बाजारात खरेदी वाढल्यास हळूहूळू इक्विटीमधील गुंतवणूक कमी करावी. ज्या गुंतवणूकदारांनी या रणनितीचा वापर केला त्यांना गेल्या सहा महिन्यात बाजारातील तीव्र चढ-उतारातही कमी नुकसान झाल्याचे JARVIS INVEST चे संस्थापक सुमित चंदा यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंडाचा पर्याय फायदेशीर

जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करा. सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP च्या माध्यमातूनही इक्विटी फंडात गुंतवणूक करू शकता. यामुळे कॉस्ट एव्हरेजिंग होते. तसेच चक्रवाढ व्याजामुळे जास्त परतावाही मिळतो. एकूणच शेअर बाजारात चढ उताराची जोखीम असते. परंतु जोखीमेचं व्यवस्थापन करून चांगला परतावा मिळवता येतो. एक चांगला गुंतवणूकदार फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही तर तो इतर आर्थिक साधनांमध्येही गुंतवणूक करत असतो.