AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महंगाई डायन…पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसचा नंबर? मायबाप सरकार, सर्वसामान्यांनी जगावं की नाही?

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी महागले. आता LPG सिलेंडरचा भाव वाढण्याची शक्यता आहे का? पश्चिम आशियातील संघर्षामुळे काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

महंगाई डायन...पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसचा नंबर? मायबाप सरकार, सर्वसामान्यांनी जगावं की नाही?
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस दरवाढ?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 2:53 PM
Share

LPG Price Update: देशभरातली पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर तीन रुपयांनी वाढल्या. पाच राजांच्या निवडणुकीनंतर इंधनाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. विरोधकांकडून याविषयीचा आरोप केला जात आहे. पण सरकारकडून अजून याविषयीची कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात 60 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर महागला होता. त्यामुळे गॅस दरवाढीची अफवा पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज 16 मे रोजी शनिवारी घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणती वाढ झालेली नाही. मुंबईत 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 912 रुपये इतकी आहे. तर व्यावसायिक 19 किलो सिलेंडरची किंमत 3,024 इतकी रुपये आहे.

देशातील प्रमुख शहरातील LPG सिलेंडरचा भाव काय?

घरगुती LPG सिलेंडर (14.2 किलो)

नवी दिल्ली – 913 रुपये

कोलकाता – 939 रुपये

मुंबई – 912.50 रुपये

चेन्नई – 928.50 रुपये

व्यावसायिक LPG सिलेंडर (19 किलो)

नवी दिल्ली – 3,071.50 रुपये

कोलकाता – 3,202 रुपये

मुंबई – 3,024 रुपये

चेन्नई – 3,237 रुपये

मार्च महिन्यात 60 रुपयांनी सिलेंडर महाग

मार्च 2026 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी महागली. त्यानंतर आतापर्यंत घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही मोठी वाढ झाली नाही. तेल कंपन्यांनी आतापर्यंत घरगुती गॅस सिलेंडरचा भाव स्थिर ठेवला आहे. पण गेल्या 15 वर्षांत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दुप्पट झाली आहे. आता गॅस सिलेंडरचा भाव वाढल्यास ग्राहकांना खूप मोठा फटका बसेल. कारण मध्यंतर एलपीजी पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड रोष होता.

व्यावसायिक सिलेंडर इतके महागडे का?

16 मे 2026 रोजी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत 993 रुपयांची मोठी वाढ झाली. तर 5 किलो FTL सिलेंडरच्या किंमतीत 261 रुपयांची वाढ झाली. त्याचा सर्वाधिक फटका हॉटेल, ढाबा, टपरी चालकांना बसला. रेस्टॉरंट, ढाबेवाल्यांच्या व्यवसायावर सर्वात मोठा परिणाम झाला. सिलेंडरचे दाम वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. तर अनेकांनी त्याला दुसरा पर्याय शोधला आहे. लाकूड फाट्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.  पण सध्या घरगुती अथवा व्यावसायिक गॅस दरवाढी संदर्भात सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Follow Us
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...