AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Rate: आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेलची दरवाढ लवकरच मागे? संकटावेळी हा देश धावला मदतीला

Petrol-Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला आहे. जागतिक ऊर्जा संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर भारतीयांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. ही दरवाढ लवकरच मागे घेण्याची शक्यता का निर्माण झाली आहे?

Petrol-Diesel Rate: आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेलची दरवाढ लवकरच मागे? संकटावेळी हा देश धावला मदतीला
पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 8:47 AM
Share

India-UAE Deal: पश्चिम आशियातील युद्धामुळे आणि अघोषीत संघर्षामुळे ऊर्जा संकट कायम आहे. भारताला त्याचा फटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे पाच राज्यातील निवडणुकानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. होर्मुज समुद्रधुनीतून कच्चे तेल आयातीला फटका बसल्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. दरम्यान या संकटावर मात करण्यासाठी आणि कच्चा तेलाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी भारताने एक मोठे पाऊल टाकले आहे. परिणामी लवकरच इंधन दरवाढ मागे घेतली जाऊ शकते अशी चर्चा होत आहे.

भारत -संयुक्त अरब अमिरात यांच्यात करार

भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशात मोठा ऊर्जा करार झाला आहे. या करारामुळे भारताच्या कच्चे तेल साठ्यात 70 टक्क्यांची वाढ होणार आहे. UAE मधील दिग्गज कंपनी अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीने (ADNOC) भारताचा तेल साठा वाढवून 3 कोटी बॅरलपर्यंत वाढवण्यावर सहमती दिली आहे. त्यामुळे भविष्यात देशाला इंधन तुटवड्याची झळ तितकी बसणार नाही.

70 टक्क्यांपर्यंत वाढेल कच्चा तेलाचा साठा

ADNOC द्वारे तेल साठा 30 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. परिणामी भारताचा तेल साठा 40 लाख टन इतका अधिक वाढेल. त्यामुळे भारताचा एकूण कच्चा तेलाचा साठा हा पूर्वीच्या तुलनेत 70 टक्के इतका वाढेल. सध्या भारताचा पेट्रोलियम साठा 5.3 दशलक्ष टन इतका आहे. हा तेल साठा विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादुर येथे असेल. युएईकडे अगोदरच भाडेतत्वावर मंगळुरू येथे तेल साठा आहे. याठिकाणी कंपनी 60 लाख बॅरल म्हणजे जवळपास 8 लाख टन कच्च्या तेलाचा साठा ठेवते.

संकटावेळी मोठी मदत

इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह्स लिमिटेडसोबत अबु धाबीची ऊर्जा कंपनी ADNOC ने हा करार केला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरातील देशांचा कच्चे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. भारतावरही त्याचा परिणाम झाला. होर्मुज समुद्रधुनीतून इंधन पुरवठा न झाल्याचा फटका भारतालाही बसला. त्यानंतर हा करार एक मोठे पाऊल मानले जात आहे. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही तर एलपीजी गॅसचाही देशाला भविष्यात तुटवडा जाणवणार नाही. तर ज्या काळात हा साठा करण्यात येईल. त्यानुसार किंमती असल्याने वाढवी किंमतीची तितकी झळ बसणार नाही. त्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्यासाठी आतापासूनच सरकार तयारी करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...