पुतीन यांच्या रशियामध्ये दारूची किंमती किती आहे? भारतापेक्षा कमी की जास्त ?

Alcohol cost in Russia : अनेकांना रशियन अल्कोहोल म्हणजे विशेषतः व्होडका खूप आवडतो. व्होडकाला भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. याच्या किमतीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पुतीन यांच्या रशियामध्ये दारूची किंमती किती आहे? भारतापेक्षा कमी की जास्त ?
alcohol price in russia
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 7:01 PM

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर काहीशी अस्थिरता आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे अनेक देशांचा व्यापार संकटात आला आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावरही अतिरिक्त कर लादलेला आहे. मात्र या करानंतरही भारत आणि रशियातील संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरळीत व्यापार सुरू आहे. पुढील आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तुलना होऊ लागली आहे. आज आपण रशियामध्ये मद्याच्या किमती किती आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतात रशियन व्होडका लोकप्रिय

हिवाळ्यात शरीर उबदार रहावे यासाठी भारतातील दारूची मागणी वाढत असते. अनेकांना रशियन अल्कोहोल म्हणजे विशेषतः व्होडका खूप आवडतो. व्होडकाला भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. याचे एक कारण म्हणजे त्याची किंमत खूप कमी आहे. रशियामध्ये अल्कोहोल खूप स्वस्त आहे. रशियन दारू आयातीनंतरही खूप स्वस्त आहे.

रशियामध्ये दारूची किंमत किती?

रशियामध्ये दारू स्वस्त आहे. एक्सप्रेस टू रशियाने दिलेल्या माहितीनुसार, एका सामान्य बारमध्ये लोकल बिअरची एक बाटली सुमारे 250 रूबल म्हणजेच 350 रुपयांना आहे. तसेच वाईन सुमारे 450 रुपयांना मिळते. मात्र वेगवेगळ्या शहरात हे दर वेगवेगळे आहेत. रशियामध्ये क्राफ्ट बिअर खूप लोकप्रिय झाली आहे. या बियरसाठी बड्या शहरातील महत्त्वाच्या बारमध्ये 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. रशियन किंवा कॉकेशियन वाईन ही इतर आंतरराष्ट्रीय वाईनपेक्षा स्वस्त आणि स्वादिष्ट आहे. याचाच अर्थ रशियामध्ये दारू भारतापेक्षा थोडी स्वस्त आहे.

भारत आणि रशियातील व्यापार

भारत आणि रशिया हे दोन्ही देश खुप जुने व्यापारी पार्टनर आहेत. दोघांमधील व्यापार नेहमीच सुरळीत राहिलेला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार $68.7 अब्ज होता, जो कोरोनापूर्वीच्या $10.1 अब्ज व्यापारापेक्षा सुमारे 5.8 पट जास्त आहे. भारताची निर्यात $4.88 अब्ज आहे आणि रशियामधून आयात $63.84 अब्ज आहे. याचाच अर्थ भारत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यात दारूच्या आयातीचाही समावेश आहे.