मुघल वंशजांचा देश उझबेकिस्तानात भारताच्या १०० रुपयांची किंमत काय ?

मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर ज्या देशातून हिंदुस्थानात आला त्या उझबेकिस्तानात आता रशियाचे राज्य नाही.रशियापासून ९०च्या दशकात स्वतंत्र झालेल्या या देशात आता भारताच्या १०० रुपयांची किंमत किती आहे याची माहिती घेऊयात...

मुघल वंशजांचा देश उझबेकिस्तानात भारताच्या १०० रुपयांची किंमत काय ?
Indian Currency Value in Uzbekistan
| Updated on: Sep 04, 2025 | 8:07 PM

मुघलांना हिंदूस्थानावर सुमारे ३३० वर्षांपर्यंत राज्य केले. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना करणारा बाबर हा तैमुर आणि चंघेज खानचा वंशज होता. बाबर मध्य आशियातील फरगनाशी संबंधित होता. आता त्या उझबेकिस्तान नावाने ओळखले जाते. केवळ १२ व्या वर्षी बाबर फरगना राज्याचा बादशहा बनला, परंतू त्याची गादीवर हक्कालपट्टी झाली. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानचा रस्ता धरला. त्यानंतर तो भारतात आला आणि १५२६ मध्ये इब्राहिम लोदी याला हरवून त्याने मुघल साम्राज्याची पाया रचला.

उझबेकिस्तानला मुघलांच्या वंशाजांचा देश म्हटले जाते. या देशाला मध्य आशियातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हटले जाते. अनेक वैशिष्ट्यांसाठी हा देश ओळखला जातो. चला तर मुघलांच्या देशात उझबेकिस्तानात भारताच्या १०० रुपयांचे किती रुपये होतात…

उझबेकिस्तानात किती भारतीय आहेत ?

उझबेकिस्तानाचे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी दरवर्षी तेथे भारतीय जात असतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार साल २०२४ मध्ये २८,२०० भारतीय उझबेकिस्तानात गेले, तर उझबेकिस्तानातील १२,५०० लोक भारतात आले. साल २०२३ मध्ये ४५,५०० भारतीय उझबेकिस्तनात गेले आणि उझबेकिस्तानचे १७,००० लोक भारतात आले.

Uzbekistan Currency
अशी आहे उझबेकिस्तानचे चलन फोटो: Getty Images

भारताचे १०० रुपये उझबेकिस्तानात किती होतात ?

मध्य आशियातील देश उझबेकिस्तानची अधिकृत करन्सीचे नाव उझबेकिस्तान सोम (Uzbekistani Soʻm) आहे. या शॉर्टमध्ये UZS लिहीतात. १९९१ च्या आधी हा देश सोव्हिएत संघ (USSR)रशियाचा एक भाग होता. त्यामुळे येथए सोव्हिएत रुबल करन्सीचा वापर केला जात होता. परंतू १९९१ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर काही वेळ येथे सोव्हिएत रुबल आणि नंतर रशियन रुबल करन्सीचा वापर झाला.
१९९३ मध्ये येथे प्रथम चलन सोमची सुरुवात झाली. हे अस्थायी चलन होते ते साध्या कागदावर छापले जाईल. त्यानंतर १९९४ नंतर नवीन सोम करन्सी सिस्टीम लागू केली. १९९४ मध्ये याची सुरुवात झाली होती. आणि यास सोम नावाने ओळखले गेले. आताही सोम करन्सी या देशात आहे.

भारताचा १ रुपया उझबेकिस्तानात जाऊन १४० उझबेकिस्तानी सोम होतो. तसेच भारताचे १०० रुपये या देशात जाऊन १४,०५२ रुपये होतात. यावरुन कळते की भारतीय आणि उझबेकिस्तान यांच्या चलनात किती अंतर आहे.

उझबेकिस्तानचे वैशिष्ट्ये –

उझबेकिस्तानला एक प्राचीन देश म्हटला जातो. त्याचा इतिहास मोठा आहे. येथे युनेस्कोने जाहीर केलेली पाच जागतिक वारसा स्थळे आहेत. यात इत्चन कला, बुखारा, समरकंद, शाखिस्याबझ आणि पश्चिमी टीएनचा समावेश आहे.

विशेष म्हणजे प्लोव्ह हे उझबेकिस्तानचे मुख्य भोजन आहे.ही येथील नॅशनल डिश आहे.लग्न आणि कौटुंबिक समारंभात ही डीश वाढली जाते. तिला तांदूळ, भाज्या आणि मांसापासून तयार केली जाते.

Uzbekistan National Dish Plov
उझबेकिस्तानची नॅशनल डिश प्लोव्ह. फोटो: unsplash

उझबेकिस्तानात बहुतांश भागात रशियन भाषा बोलली जाते. रशियाने येथे २०० वर्षे राज्य केले होते. याचा परिणाम येथील भाषेवर झाला आहे. येथील अर्थव्यवस्था सोने आणि कापसावर अवलंबून आहे. या दोन्ही वस्तूंची निर्यात झाल्याने देशातील उत्पन्नात त्यांचा वाटा अधिक आहे. या देशास जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश म्हटले जाते.