AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपाचा अत्यंत मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 22..

अजित पवार यांचे निधन झाले असून राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपाचा अत्यंत मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 22..
Ajit Pawar and Devendra Fadnavis
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Feb 02, 2026 | 5:52 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदीजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानातील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. या विमान अपघातांचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाली. हा विमान अपघात नक्की कसा झाला हे देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मोठे नुकसान झाले. आजही कोणाला विश्वास बसत नाही की, अजित पवार हे आपल्यात नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर घडामोडींना प्रचंड वेग आला. यासोबतच पवार कुटुंबियातील वाद दिसला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, त्यानंतर सुनेत्रा पवार शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता थेट मुंबईला दाखल झाल्या.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यांना अजित पवार यांचे अर्थखाते मिळाले नाही. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनीची पक्षाची धुरा हातात घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.

पार्थ पवार याला राज्यसभेवर पाठवण्याकरिता भाजपा देखील सकारात्मक आहे. भाजपाने अगोदरच स्पष्ट केले की, आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या निर्णयामागे आहोत. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर प्रचार थंड पडला आहे. यादरम्यानच भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मोठा निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सर्व प्रचार सभा रद्द केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस 7 दिवसांमध्ये तब्बव 22 सभा घेणार होते. मात्र, त्यांनी आता सर्व सभा रद्द केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं