अकाऊंट स्टेटमेंट मागितले तर बँकेने 4150 रुपये घेतले, एसबीआयने दिले हे उत्तर

बँक त्यांच्या सेवेबद्दल ग्राहकाकडून शुल्क देखील घेते, ज्यात बँक स्टेटमेंटचा देखील समाविष्ट असते. तुम्हाला माहिती आहे का की, जर तुम्ही बँकेत जाऊन तुमचे स्टेटमेंट मागितले तर बँक त्यावर शुल्क आकारते, म्हणजेच तुम्हाला तुमचे बँक स्टेटमेंट फुकट मिळत नाही.

अकाऊंट स्टेटमेंट मागितले तर बँकेने 4150 रुपये घेतले, एसबीआयने दिले हे उत्तर
SBI Alert
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 7:33 AM

नवी दिल्लीः ज्या लोकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बँक खातेदारांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवते आणि आता ग्राहकांच्या घरातून बरीच कामे केली जातात. परंतु बँक त्यांच्या सेवेबद्दल ग्राहकाकडून शुल्क देखील घेते, ज्यात बँक स्टेटमेंटचा देखील समाविष्ट असते. तुम्हाला माहिती आहे का की, जर तुम्ही बँकेत जाऊन तुमचे स्टेटमेंट मागितले तर बँक त्यावर शुल्क आकारते, म्हणजेच तुम्हाला तुमचे बँक स्टेटमेंट फुकट मिळत नाही.

…तर बँकेला किती पैसे द्यावे लागतील

अशा परिस्थितीत बँकेच्या अकाऊंट स्टेटमेंटबाबत काय नियम आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अकाऊंट स्टेटमेंट छापण्याची गरज असेल, तर बँकेला किती पैसे द्यावे लागतील. बँक स्टेटमेंटशी संबंधित अनेक खास गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. खरं तर अलीकडेच एका ग्राहकाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे की, बँकेने खात्याचे स्टेटमेंट मागितले म्हणून त्याच्याकडून 4180 रुपये कापलेत. त्यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, माझ्याकडून 4 महिन्यांच्या स्टेटमेंटसाठी 4150 रुपये आकारले गेलेत आणि बँक स्टेटमेंट 80 पानांचे आहे, म्हणजे एका पानासाठी सुमारे 50 रुपये घेतले गेलेत.

काय करावे लागेल?

यावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे एक उत्तर देण्यात आले, ज्यामध्ये एक लिंक देण्यात आली, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या बँक शुल्काची माहिती आहे. तसेच बँक म्हणते, ‘जर तुम्हाला असे वाटत असेल की, चुकीचे शुल्क घेतले गेलेय, तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ विद्यमान ग्राहक // MSME/ Agri/ Other Grievance >> >> अंतर्गत तुम्ही जाऊ शकता. बँकिंग // शुल्क संबंधित श्रेणीमध्ये तक्रार करा. याशिवाय तुम्ही SBI च्या हेल्पलाईन नंबर 1800 11 2211 (टोल फ्री), 1800 425 3800 (टोल फ्री) किंवा 080-26599990 वर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कॉल करू शकता.

काय आहेत नियम?

बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, जर तुम्ही ईमेलद्वारे अकाऊंट स्टेटमेंट मागितले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परंतु जर तुम्ही अकाऊंट स्टेटमेंट फिजिकली मागितले तर तुम्हाला प्रति पेज 44 रुपये जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर चालू खात्यातील एका पानाचा दर 100 रुपये आहे.

पासबुकवर शुल्क आहे का?

बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा पहिले पासबुक बँकेकडून दिले जाते, त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पहिले पासबुक तुम्हाला मोफत दिले जाते. यानंतर जर तुम्हाला दुसरे पासबुक बनवले गेले, तर तुम्हाला 100 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. तसेच प्रति पृष्ठ 50 रुपये जीएसटी (40 नोंदी) देखील आकारले जातात. अशा परिस्थितीत आजकाल पासबुक छापण्यासाठीही शुल्क आकारले जात आहे.

संबंधित बातम्या

तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’चा हा मेसेज आलाय, मग व्हा सावध अन्यथा…!

PMJDY: 43.04 कोटी जन धन बँक खाती 7 वर्षांत उघडली, जाणून घ्या त्यांच्यात किती पैसे जमा?

When asked for an account statement, the bank took Rs 4,150, SBI replied