डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा मोफत अपघाती विमा, कोणाला लाभ मिळणार?

| Updated on: Nov 27, 2021 | 4:06 PM

अपघाती विम्याची किंमत किती असेल हे तुम्ही कोणते कार्ड वापरता त्यावर अवलंबून असते. ही रक्कम वेगवेगळ्या कार्डांसाठी बदलत असते. SBI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, SBI गोल्डसाठी 2 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डसाठी 5 लाख रुपये, प्राईड कार्डसाठी 2 लाख रुपये, प्रीमियम कार्डसाठी 5 लाख रुपये आणि व्हिसा, स्वाक्षरी आणि मास्टरकार्डसाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण आहे. हे विमा संरक्षण 10 लाख रुपयांपर्यंतचे आहे.

डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा मोफत अपघाती विमा, कोणाला लाभ मिळणार?
Debit Card
Follow us on

नवी दिल्लीः आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आपल्याला मोफत विमा मिळतो, याची कदाचित तुम्हाला माहिती नसेल. विशेष म्हणजे हा विमा विविध प्रकारच्या कार्डांवर 10 लाख रुपयांपर्यंत असतो. याला अपघाती विमासुद्धा म्हणतात. हे विमा संरक्षण एकतर मास्टरकार्ड, रुपे कार्ड, व्हिसा कार्ड कंपनी यांसारख्या कार्ड देणाऱ्यांद्वारे दिले जाते किंवा या कंपन्या बँकांच्या सहकार्याने मोफत विमा संरक्षण पुरवतात. विम्याचा लाभ तेव्हाच मिळतो, जेव्हा कार्डधारकाचा अपघाती मृत्यू होतो किंवा कायमचे अपंगत्व येते.

विम्याची किंमत तुम्ही कोणते कार्ड वापरता त्यावर अवलंबून

अपघाती विम्याची किंमत किती असेल हे तुम्ही कोणते कार्ड वापरता त्यावर अवलंबून असते. ही रक्कम वेगवेगळ्या कार्डांसाठी बदलत असते. SBI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, SBI गोल्डसाठी 2 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डसाठी 5 लाख रुपये, प्राईड कार्डसाठी 2 लाख रुपये, प्रीमियम कार्डसाठी 5 लाख रुपये आणि व्हिसा, स्वाक्षरी आणि मास्टरकार्डसाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण आहे. हे विमा संरक्षण 10 लाख रुपयांपर्यंतचे आहे.

कार्ड 90 दिवसांच्या आत वापरले पाहिजे

नियम आणि अटींबद्दल बोलायचे झाल्यास कार्ड अपघाताच्या 90 दिवस आधी वापरात असले पाहिजे. तसे न झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. विमा संरक्षणाबद्दल वर दिलेली सर्व माहिती विमान अपघात नसलेल्यांबद्दल आहे. जर कार्डधारकाचा विमान अपघातात मृत्यू झाला तर विमा संरक्षण जवळजवळ दुप्पट मिळणार आहे. मात्र त्यासाठी ते कार्ड एअर तिकीट बुकिंगमध्ये वापरलेले असणे आवश्यक आहे.

खरेदी संरक्षणाचा फायदा मिळणार

याशिवाय डेबिट कार्डवर खरेदी संरक्षणाचा लाभही उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही त्या कार्डने खरेदी केली असेल आणि 90 दिवसांच्या आत ती वस्तू तुमच्या कारमधून किंवा तुमच्या घरातून चोरीला गेली असेल, तेव्हा त्याचा फायदा मिळेल. एसबीआय गोल्डसाठी 5000 रुपये, प्लॅटिनम कार्डसाठी 50,000 रुपये, एसबीआय प्राइडवर 5000 रुपये, प्रीमियम कार्डवर 50,000 रुपये आणि व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डवर 1 लाख रुपयांचे खरेदी संरक्षण आहे.

संबंधित बातम्या

paytm : गेल्या 3 महिन्यात पेटीएमला 482 कोटींचा फटका, युजर्सच्या संख्येत चांगली वाढ

Stock market : शेअर मार्केटचा बिग बुल कोट्यवधींना बुडाला, राकेश झुनझुनवालांना 753 कोटींचा फटका