AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock market : शेअर मार्केटचा बिग बुल कोट्यवधींना बुडाला, राकेश झुनझुनवालांना 753 कोटींचा फटका

टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपतीतही मोठी घट झाली आहे. प्रतिशेअर 174 रुपये म्हणजेच जवळपास 7 टक्क्यांनी आठवडाभरात घसरण झाली आहे.

Stock market : शेअर मार्केटचा बिग बुल कोट्यवधींना बुडाला, राकेश झुनझुनवालांना 753 कोटींचा फटका
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 27, 2021 | 4:09 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शेअर बाजार सतत कोसळत असतानाच शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात झुनझुनवालाचं अवघ्या एका आठवड्यात तब्बल 753 कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. गुंतवणूकरांसाठी  गेला शुक्रवार जणू ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला आहे. टायटन कंपनीचा शेअर काही टक्क्यांनी पड्ल्यांने राकेश झुनझुनवालांनाही मोठं नुकसान झालं आहे.

राकेश झुनझुनवालांच्या संपतीत मोठी घट

टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपतीतही मोठी घट झाली आहे. प्रतिशेअर 174 रुपये म्हणजेच जवळपास 7 टक्क्यांनी आठवडाभरात घसरण झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची भागिदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे साधारणपणे साडेचार टक्के शेअर आहेत. प्रतिशेअर 174 रुपयांचं नुकसान झाल्यानं झुनझुनवालांना एकूण 153 कोटींचा फटका बसला आहे.

मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण

शेअर बाजारातील घसरणीचा फटका फक्त राकेश झुनझुनवालांनाच नाही बसला. अनेक छोट्या-बड्या गुंतवणूकरांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सर्व गुंतवणूकदारांचं मिळून जवळपास 16 हजार कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे ही घसरण थांबणार की  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे ही घसरण आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अमेरिका आणि जपानमधील शेअर बाजारालाही फटका

दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रोन व्हेरिएंट आढल्यानं त्याचा फटका अमेरिका आणि जपानमधील शेअर बाजारालाही बसला आहे. जपान आणि अमेरिकेतही गुतवणूकरांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | संगीत, मेहंदी अन् शाही विवाह, ‘या’ दिवशी रंगणार कतरिना-विकीच्या लग्नाचे सोहळे!

IPL 2022: रोहित, विराट, धोनीचा ऑक्शनमध्ये सहभाग अशक्य, CSK, MI, DC, RCB, KKR कोणते खेळाडू रिटेन करणार?

TV9 च्या Dare2Dream अवॉर्ड्समध्ये MSME मंत्रालयाचे सचिव बी.बी. स्वॅईन मार्गदर्शन करणार

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप